नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra Veer Vinayak Damodar savarkar) यांची आज 141 वी जयंती आहे. यानिमित्त नाशिकमधील भगूर (Bhagur) येथील सावरकर स्मारकात (Savarkar Smarak) सकाळपासूनच सावरकर प्रेमींनी सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच सावरकर स्मारकात हजेरी लावत अभिवादन केले. सावरकर जयंतीनिमित्त सावरकर वाडा आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे.
तर इंग्रज काळात स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिलेल्या अभिनव भारत मंदिर (Abhinav Bharat Mandir) येथे आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमित्ताने सावरकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. काँग्रेस नेते शाहू खैरे यांच्याकडून अभिनव भारत मंदिर या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनव भारत मंदिराच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी या ठिकाणी काँग्रेस नेते शाहू खैरे (Shahu Khaire) यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आली.
सावरकर उद्यानाचे काम रखडले, स्थानिक नागरिकाचे आंदोलन
दरम्यान, नाशिकमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सावरकरांना अभिवादन करत असताना राजकीय नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. सावरकरांच्या नावावरून, भारत रत्न घोषणेवरून नेहमीच आरोप प्रत्यारोप केले जातात. मात्र त्या एकाही संघटनेचा मोठा नेता, पदाधिकारीची पावले सावरकर स्मारकाच्या दिशेने अद्यापपर्यंत वळाली नव्हती. दरम्यान सावरकरांच्या जन्मभूमीत सावरकर उद्यानाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकाने सकाळपासून हातात फलक घेऊन आंदोलनाला सरुवात केली आहे.
पंतप्रधान मोदींकडून वीर सावरकरांना वंदन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच मातृभूमीच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणारे महान स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांत खदखद; मिसळ पार्टीतील नाराजीचा ठसका शिवतीर्थापर्यंत जाणार का?