MBBS Exam : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (MBBS Exam) हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी (Microbiology) विषयाचा शुक्रवारी दुपारच्या सत्रात घेण्यात आला. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हातात हा पेपर पडल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. याचं कारण म्हणजे हा पेपर अगदी जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता. यामुळे खरंतर चार महिन्यांपूर्वीच हा पेपर फुटला होता हे सिद्ध झालं आहे. 


मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना दिली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तरी, तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली असून या संदर्भात विद्यापीठाने घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यापीठाच्या वतीने एमबीबीएस (2019) द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी - 1 या विषयाची शंभर गुणांची लेखी परीक्षा शुक्रवारी दुपारच्या सत्रात अडीच ते साडेपाचदरम्यान राज्यातील 41 केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेला सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती होती. 


26 मार्चला होणार फेरपरीक्षा :


विद्यापीठाला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर परीक्षा मंडळाने याची गंभीर दखल घेत शनिवारी बैठक घेतली. बैठकीत या विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी, या विषयाची फेरपरीक्षा 26 मार्चला सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे  


या बाबत लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha