ठाणे : ठाण्याच्या कोपरी येथून नालासोपाराकडे निघालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसचा काजुपाड्याजवळ ब्रेक फेल झाला. यामुळे अपघात होऊन बस दुसऱ्या बाजूला नाल्यात गेली. मात्र घडलेल्या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. बस मधील चाळीस प्रवाशांपैकी काहींना किरकोळ मार लागला. बसचे चालक आणि वाहक देखील सुरक्षित आहेत. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली.
ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस कोपरी ते नालासोपारा करिता निघाली असता काजुपाडा जवळ टीएमटी बसचा ब्रेक फेल झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला आदळून ती दुसऱ्या बाजूला गेली. त्या रस्त्याच्या बाजूलाच नाला असल्याने बस नाल्याच्या चिखलात रुतली. यावेळी बस नाल्यात उलटली असती तर अप्रिय दुर्घटना घडली असती आणि चाळीस प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता. सुदैवाने, बस नाल्यात उलटली नाही आणि पुढची दुर्घटना टळली.
यावेळी बसमध्ये जवळपास चाळीस प्रवाशी प्रवास करीत होते. बस चिखलात रुतली नसती तर नाल्यात पडली असती आणि चाळीस प्रवाशांचे जीव धोक्यात आले असते. मात्र अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी मदत करून आतल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यापैकी काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर बसचा चालक आणि वाहक देखील सुखरूप आहेत.
नाल्यातील चिखलात रुतलेल्या बसमधील प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने लगेच बाहेर काढण्यात आलं. पण बस चिखलात रुतल्याने बराच वेळ प्रयत्न करुनही बस बाहेर येत नव्हती. अखेर क्रेनच्या सहाय्याने रुतलेल्या बसला बाहेर काढण्यात यश आलं.
संबंधित बातम्या :