Thane School : शाळा नव्हे, बेवारशी वस्तूंचं गोडाऊन ! ठाणे महापालकेच्या शाळांचं भयाण वास्तव समोर
Continues below advertisement
Thane : ठाणे महापालकेने शाळा नंबर 34 वाऱ्यावर सोडलीये. विद्यार्थी कमी म्हणून बंद करण्यात आलेली ही शाळा स्थानिकांनी स्वतःच्या नावावर तेवढी करायची बाकी आहे. राजकीय पाठिंब्यामुळे पालिका अधिकारी देखील गप्प आहेत का? असा प्रश्न इथे निर्माण होतोय. सध्या या शाळेच्या जागेचा वापर नानाविध गोष्टींसाठी केला जातोय. आश्चर्य म्हणजे इथल्या वर्गांमध्ये विद्यार्थी नाही तर कुटुंब वास्तव्याला आहेत. कोणा एका बिल्डरने त्यांना घरे दिली नाही म्हणून राजकीय वरदहस्ताने ते इथे राहत आहेत. तर कोणी या शाळेत स्वतःची बाईक पार्क करतोय.
Continues below advertisement