Maharashtra Politics : नाशिकमध्ये (Nashik) शिवसैनिक (Shivsena Workers) आक्रमक झाले असून बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरला शिवसैनिकांनी काळे फासले आहे. त्यामुळे शहरात उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक अशा दोन गटात चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. 


एकीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्य राजकीय वातावरण (Maharashtra Political Crisis) चांगलेच ढवळून निघाले आहे. यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बंड खोर एकनाथ शिंदे गट यांच्यात दोन दिवसापासून रणकंदन माजले आहे. अशातच राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये देखील याचे पडसाद उमटत असून शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात जोरदार बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर


याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे समर्थक असलेल्या गटाने काल शहरात महत्वाच्या ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. मात्र शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरला शिवसैनिकांनी काळे फासले आहे. नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये एकनाथ शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र आता कट्टर शिवसैनिकांकडून याला विरोध दर्शवत शहरात शिंदे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरबाजीला कट्टर शिवसैनिकांनी काळे फासले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे नाशिकमध्ये देखील आशा पद्धतीने पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: