Sanjay Raut Nashik नाशिक : सोमवारपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. यामुळे ठाकरे गटाचे अनेक नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजच्या अधिवेशनात पाच ठरव मांडले जाणार असल्याची माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. हा दिवस ते असतानादेखील आम्ही साजरा करतो होतो. ते आज नाहीत ही जाणीव जरी असली तरी ते आमच्यासोबत आहेत. त्यांचे आजही अस्तित्व आहे. ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा यांचा जन्म दिवस वेगवेगळ्या उपक्रमातून साजरा करतो.
बहुतेक प्रभू श्रीरामानेच हे योजले असेल
आज विशेष असा जन्मदिवस आम्ही साजरा करतोय. हा योगायोग आहे की, काल अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाले. बहुतेक हे रामानेच योजले आहे. ज्या बाळासाहेबांनी राम मंदिरासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. त्या रामाने मंदिरात जाण्यासाठी दिवस कुठला निवडावा, तर शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला. 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात आरती केली.
मराठा आरक्षणावर मांडणार ठराव
अधिवेशनात ठाकरे गटाकडून पाच ठराव मांडले जाणार आहेत. राजकीय अधिवेशन होते तेव्हा राजकीय प्रस्ताव पारित केले जातात. आज देशात अनेक प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, अशा प्रश्नांवर चर्चा होतील. नाशिकच्या भूमीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल.
असे होणार राज्यव्यापी अधिवेशन
दरम्यान, ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन सकाळी 10.05 ध्वजारोहन आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण सुरु होणार आहे. 10.30 वाजता विनायक राऊत प्रास्ताविक करतील. 11 वाजता प्रमुख वक्ते संजय राऊत, अरविंद सावंत, सुषमा अंधारे हे भाषण करतील. त्यानंतर संघटनात्मक ठराव अनिल देसाई, भास्कर जाधव मांडतील. 12 वाजता आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील. 12.30 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
आणखी वाचा