नाशिक : शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज नाशिकमध्ये (Nashik News) पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करून आणि ध्वज वंदन करून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अधिवेशन होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने अधिवेशनचा समारोप होणार आहे. त्यांनतर खुले अधिवेशन ( जाहीर सभा) सायंकाळी 6 वजाता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे.
गेल्या 30 वर्षांमध्ये शिवसेनेत अनेक घडामोडी घडल्या. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तर त्यांनी उभी केलेली संघटना आता एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी झालेत या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अधिवेशनाकडे राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा
यंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणारया खुल्या अधिवेशनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित राहतील.
ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल
22 तारखेला आयोद्धेत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनची आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची धूम राहणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होत आहेत.
भाषणाने शिबिराचा समारोप
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 10 ते 2 वाजेपर्यंत प्रमुख वक्ते बोलणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल. सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मात्र सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.
काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंकडून महाआरती
उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली. ते पूर्व महाद्वारातून काळाराम मंदिरात दाखल झाले. प्रथम त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन त्यांनी घेतले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळी महापूजा आणि महाआरती करण्यात आली. काळाराम मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.
हे ही वाचा :