Rajabhau Waje vs Hemant Godse : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली असून यंदा देखील ते निवडूनच येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे.
काल हेमंत गोडसेंनी महायुतीतील (Mahayuti) दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज देखील भरलाय. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे हेमंत गोडसेंचं मला अजिबात आव्हान वाटत नाही, शंभर टक्के विजय माझाच होणार असा विश्वास गोडसेंचे प्रतिस्पर्धी असलेले नाशिकचे ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी व्यक्त केला आहे.
लढत होईल पण 100 टक्के विजय माझाच - राजाभाऊ वाजे
राजाभाऊ वाजे म्हणाले की, माझं प्रामाणिक मत आहे की, मला हेमंत गोडसेंचं आव्हान वाटतच नाही. 37 दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात फिरतोय आणि वातावरण अनुकूल आहे. निवडणूक ही सोपी कधीच नसते. लढत होईल पण, 100 टक्के विजय माझाच होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीबाबत सकारात्मक वातावरण - राजाभाऊ वाजे
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि एकूणच महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) सकारात्मक वातावरण आहे. मी आमदार असताना प्रामाणिकपणे कामे केली असून शिवसेनेशी (Shiv Sena) मी निष्ठावान आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) दहा वर्षात काही काम झाले नाही असे मतदार सांगतात, मी समाज उपयोगी काम करेल. टीका करायला जागा नसल्याने मी ग्रामीण भागातला आहे असे विरोधक म्हणतात. मात्र मी इंग्रजी शाळेतून शिकलेलो आहे, असेही राजाभाऊ वाजे म्हणाले.
राजाभाऊ वाजेंचं सूचक वक्तव्य
हेमंत गोडसेंवर नाराज महायुतीतील नेते तुम्हाला मदत करणार का? या प्रश्नावर बोलताना राजकारणात सगळ्याच गोष्टी उघड करून बोलता येत नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता नाशिक लोकसभा मतदारसंघात नक्की कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या