Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीत एकमत होत नसल्याचे चित्र आहे. तर, जागावाटपावरून अजित पवार गट नाराज असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावरूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महायुतीवर (Mahayuti) निशाणा साधला आहे. जागावाटपावरून महायुतीत गडबड आणि भांडण सुरु आहेत. भविष्यात फारच भयानक परिस्थिती होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. 


महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलतांना नाना पटोल म्हणाले की, "जागावाटपावरून महायुतीत गडबड सुरू आहे, महाविकास आघाडीत कोणतीही गडबड नाही. आता तर महायुतीत भांडण सुरू झाले आहे. भविष्यात फारच भयानक परिस्थिती होणार आहे. महाविकास आघाडी योग्यवेळी जागा जाहीर करेल. महायुतीत काय व्हायच ते होईल, त्यांना सत्तेची मस्ती आहे. जनतेचे प्रश्न वाऱ्यावर आहे, धान खरेदी नाही, पेपरफुटी सुरू आहे, सरकार त्यावर काही करत नाही. हुशार मुलांचं नुकसान सुरू आहे, असे नाना पटोले म्हणाले. 


जागावाटपाबद्दल अजूनही अंतिम निर्णय नाही : बावनकुळे


दरम्यान महायुतीच्या जागावाटपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. "जागावाटप बद्दल अजूनही अंतिम निर्णय नाही, प्राथमिक चर्चा झाली असून, उत्तम व समाधानकारक चर्चा झाली आहे. 11  किंवा 12 तारखेपर्यंत महायुतीचा जागा वाटप होईल. मित्र पक्षाने(शिंदे, अजित दादा) आपली बाजू मांडली आहे, आम्ही आमची बाजू मांडली आहे. जो उमेदवार निवडणून येईल त्याला उमेदवारी देऊ असे आमचे ठरले आहे.


जागावाटपावरून महायुतीमध्ये घमासान


पुढील काही दिवसांत कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. असे असतांना जागावाटपासाठी महायुतीच्या बैठका वाढली आहे. स्वतः भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत देखील बैठका झाल्या. मात्र, जागावाटपावरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याने तीनही पक्षात घमासान पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्या असा आग्रह अजित पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे कोणी काही मागायला हरकत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय हा वास्तविकतेवर आधारित होईल, असे फडणवीस म्हणाले आहेत. म्हणजेच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारांच्या संख्येच्या प्रमाणातच लोकसभेच्या जागा त्यांना दिल्या जातील, असा याचा अर्थ काढला जातोय. त्यामुळे महायुतीत कोणाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


महायुतीच्या जागावाटपावरून छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "आमचे उमेदवार मोदी लाटेविरोधात लढलेत, त्यामुळे..."