नाशिक : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी भाजपला (BJP) एकेकाळी संघाची गरज लागत होती. पण, आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे वक्तव्य केले. यावरून आता राजकारण तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.


जे पी नड्डा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते आतापर्यंत आरएसएसची उपस्थिती कशी बदलली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जे पी नड्डा म्हणाले की, सुरुवातीला आम्ही अक्षम असू, थोडे कमी असू. आरएसएसची गरज लागायची. पण आज सक्षम आहोत. त्यामुळे भाजप पक्ष आम्ही आमचा चालवतो, असे त्यांनी म्हटले. 


भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नकोय


यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. ज्या शिडीने वर आले आता तीच शिडी सोडायला तयार आहेत.  मी मोहन भागवतांना विचारले होते की, मागच्या दोन वर्षात मोदींनी भेटायला वेळ दिली का? याचे उत्तर मला अजूनही आलेलं नाही.  जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावरून सर्व दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नकोय, आता टोला त्यांनी लगावला. 


उद्धव ठाकरेंचा दिखावा 


इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पाकिस्तानचा मुद्दा काढला जात आहे. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. मोदींना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल, असे त्यांनी म्हटले. यावर प्रकाश आंबेडकरांना विचारले असता ते म्हणाले की,  मला त्यांच्यावर टीका करायची नाही. त्यांना मुस्लिमांनी प्रश्न विचारला होता लोकसभा संपल्यानंतर भाजपसोबत समझोता करणार की नाही करणार?  त्याचं उत्तर न देता ते मोदींवर टीका करत आहेत हा दिखावा आहे, असे त्यांनी म्हटले.  


दोन भावंडांमध्ये लॉयल्टीची रेस


सध्या असली शिवसेना आणि नकली शिवसेना यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्या एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) जी शिवसेना आहे तिचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) झाले तर आश्चर्य व्यक्त करू नये. नरेंद्र मोदी आणि बीजेपी यांनी दोन भावंडांमध्ये रेस लावलेली आहे. लॉयल्टीची रेस लावलेली आहे. मोदी म्हणालेत गरज पडली तर उद्धवजींना सर्वतोपरी मदत करेल आणि दुसरीकडे राज ठाकरे यांना प्रचाराला येण्यासाठी मजबूर करणे. दोन भावंडांमध्ये अधिक लॉयल्टी कोणाकडे यामध्ये चुरस लावलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही भाजपसोबत असतील, अशी परिस्थिती दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


उद्या संघालाही नकली म्हणतील, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात