National Youth Festival नाशिक : यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी (ता. १२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सभास्थळी येणाऱ्यांसाठी ठिकठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यासंदर्भातील अधिसूचना शहर पोलिस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केल्या आहे. जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल


हे मार्ग असतील बंद


1. संतोष टी पॉइंट ते स्वामिनारायण चौकीकडे जाणारा मार्ग.
2. तपोवन चौफुली ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग.
3. स्वामिनारायण चौक ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग.
4. काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉइंटकडे जाणारा मार्ग.
5. अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग.
6. जनार्दन स्वामी मठ टी पॉइंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग.
7. लक्ष्मीनारायण मंदिर ते तपोवनकडे जाणारा मार्ग.
8. निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग.
9. विडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग.
10. नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारा मार्ग.
11. रासबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग.
12. तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग.
13. दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग.
14. टाकळी गाव, काठे चौकाकडून सिद्धिविनायक चौक, अमृतधामकडे जाणारा मार्ग.
15. सीतागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग.
16. काळाराम मंदिर ते नाग चौक, काठ्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग.
17.सरदार चौक ते काळाराम मंदिरकडे जाणारा येणारा मार्ग.
18. मालेगाव स्टॅन्ड ते रामकुंड, गाडगे महाराज पुलापर्यंत जाणारा-येणारा मार्ग.


असे आहेत पर्यायी मार्ग


1.द्वारका उड्डाणपुलावरून ये-जा करता येणार.
2.अमृतधाम, रासबिहारीमार्गे ये-जा.
3. नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक बिटको, नाशिक रोड, जेल रोड, जत्रा चौफुलीमार्गे.
4. नाशिक रोडकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फेम सिग्नल, डीजीपीनगर, वडाळागाव, कलानगर, पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे. 
5. दिंडोरी, पेठ रोडकडून येणारी वाहने पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड,रविवार कारंजा, रामवाडी पूलमार्गे इतरत्र.


अशी आहे पार्किंग व्यवस्था


1. वणी, दिंडोरी, पेठ रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी दत्ताजी मोगरे मैदान, पंचवटी.
2. मुंबई, इगतपुरी, घोटी, वाडीव-हे, त्र्यंबक, जव्हार, अंबड, सिडको, भद्रकालीकडून सभेसाठी येणारी वाहने मुंबई-आग्रा रोडने जुना मुंबई नाका, द्वारका सर्कल, ट्रॅक्टर हाउसकडून घंडागाडी डेपोजवळ पार्किंग.
3. पुणे महामार्गाने येणारी वाहने नाशिक रोड रेल्वेपुलावरून खाली उतरून बिटको सिग्नलवरून जेल रोडकडे वळतील. औरंगाबादरोडवरील रुद्रा फार्म मैदान, शरद वाणी यांची खासगी जागा, गीताई लॉन्स, शहाणे फार्म याठिकाणी वाहन पार्किंग.
3. औरंगाबाद रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी लक्ष्मीविजय लॉन्स, रामसीता लॉन्स, यशवंत लॉन्स याठिकाणी पार्किंग.
4. मालेगाव, धुळ्याकडून येणारी वाहने डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय चौफुली मैदानावर वाहन पार्किंग.
5. मुंबईकडून धुळे व धुळ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहने उड्डाणपुलावरून मार्गस्थ होतील.
6. मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव, वडाळागाव, डीजीपीनगर, फेम सिग्नल, पुणे महामार्गान बिटको सिग्नलवरून जेल रोडमार्गे मार्गस्थ.
7. रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, दिंडोरी रोड, पेठ रोड, रामवाडी पूल, चोपडा लॉन्समार्गे येणारी वाहने तपोवन रोडच्या उजव्या बाजूने बुटूक हनुमान येथील मोकळ्या मैदानात वाहन पार्किंग.
8. खासदार, आमदार, शासकीय, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तपोवन सिटीलिंक बसस्थानक येथे वाहन पार्किंग. 


आणखी वाचा


Digha Station Exclusive : अखेर ठरलं! दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पीएम मोदींच्या हस्ते होणार