Digha Station Exclusive : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाच्या (Digha Railway Station) उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरलाय. दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उरण रेल्व मार्गिकेचे उद्घाटन देखील मोदींच्या हस्तेच केले जाईल, अशी माहिती 'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेली माहिती आज (दि.11) अधिकृत कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकाच्या मुद्यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राजन विचारे यांनी आंदोलन केले होते. 


दिघा रेल्वे स्थानकासाठी 428 कोटींचा खर्च (Digha Railway Station)


ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची (Digha Railway Station)  भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले असून, आता पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दिघा रेल्वे स्थानकासाठी ४२८ कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून, तिथं आयटी कंपन्याही आल्या आहेत. पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये  येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.


9 महिन्यांपासून दिघा रेल्वे स्थानक तयार - आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)


दिघा रेल्वेस्थानक 9 महिन्यांपासून तयार झाले आहे. इथे लाईट सुरु आहे, स्वच्छता देखील केली जातेय पण यासाठी पैसा आपण भरत आहोत. रेल्वे मंत्र्यांना मी विनंती करतो, हवं तर सेल्फी काढून पाठवतो, हे रेल्वे स्थानक लवकरात लवकर सुरु करा. मागील अनेक महिन्यांपासून दिघा रेल्वे स्थानाकाची सगळेजण वाट पाहताोय. ट्रेन कधी सुरु होणार असा प्रश्न जसा पडलाय, तसाच अच्छे दिन कधी येणार असा देखील प्रश्न पडलाय, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. दिघा स्टेशन (Digha Station), उरण रेल्वेलाईन केवळ व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केली होती. रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत, असल्याचे म्हणत टीका केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या 


Sandeep Deshpande : तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा; मनसेचा अंबानींवर हल्लाबोल