मुंबई : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज काळाराम मंदिरात ( स्वच्छताही केली. 22 जानेवारीला होणाऱ्या राममंदिर सोहळ्याआधी देशातल्या सर्व मंदिरात स्वच्छता मोहिम राबवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी याआधीच केलं होतं. त्यानुसार काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी पूजन झाल्यावर हाती झाडू घेत स्वच्छता केली. तसेच देशातील युवकांना स्थानिक उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आणि आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असा सल्ला मोदींनी तरूणांना दिला आहे. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील मुख्य दहा मुद्दे जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांचे तीन मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना तीन मंत्र दिले आहेत. व स्थानिक वस्तूंचा जास्तीत वापर करा. देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या निष्ठेने सशक्त आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल, हा मला विश्वास आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
- मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा.
- मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका
- आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा.
महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले: पंतप्रधान मोदी
स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी युवकांसोबत नाशिकमध्ये आहे हे माझे सौभाग्य आहे. आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी मला महारष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटीकोटी नमन करतो. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले.अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांना घडवले आहे. मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी नारीशक्तीला कोटी कोटी वंदन करतो.
नाशिकची भूमी प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांना माझी विनंती आहे की, भव्य रामाच्या उभारणीसाठी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवसापासून देशभरातील 22 जानेवारीतील सर्व तीर्थक्षेत्रावर स्वच्छता मोहीम राबवावी. प्रभू रामांनी पंचवटीत वास्तव्यास होते. त्याच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. मी या भूमीला वंदन करते. काळाराम मंदिरात येण्याची आणि स्वच्छता करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा.
महाराष्ट्र ही वीरभूमी, अनेक महापुरूष या पुण्यभूमीत घडले : पंतप्रधान मोदी
केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या भूमीशी संबंध आहे. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारख्या वीरमातेने न छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला जन्म दिला. याच धर्तीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकरसारख्या महान नारीशक्ती देशाला दिली. याच धर्तीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर दिले.
आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहा : पंतप्रधान मोदी
महाराष्ट्रातील युवकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे.आजचा दिवस युवाशक्तीचा दिवस आहे. भारतातील युवक सामर्थ्यशाली आहे. देशातील युवकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. इतिहस घडवण्याची सनवर्णसंधी आपल्या युवावर्गाकडे आहे. आत्ताची पिढी सर्वात भाग्यवान पिढी आहे. युवकाच्या परिश्रमामुळे जगभरात आपले स्वकार्याने आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहा. देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. येत्या कालखंडात तुम्ही असं काम करा की आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील.
महान पुरुषांनी देशाला नवी दिशा दिली : पंतप्रधान मोदी
आजही आपण सर विश्वेश्वरैया यांच्या आठवणीत इंजिनिअर दिवस साजरा करतो. त्यांनी जे बाराव्या शतकात इंजिनिअरिंग कौशल्य दाखवलं ते आजही लाजवाब आहे. आजही आपण मेजर ध्यानचंद यांची जादूई हॉकीच्या प्रेमात आहोत. आजही आपण भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद यांचे पराक्रम विसरलो नाहीत.आज आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीवर आहे. या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक शिक्षणाची दारं उघडली. या सर्व महानव्यक्तांनी देशासाठी आयुष्य वेचलं. हे सर्व जगले ते फक्त देशासाठी, स्वप्न बघितलं ते देशासाठी, संकल्प केले ते सुद्धा देशासाठी. या सर्वांनी देशाला नवी दिशा दिली.
पुढील 25 वर्ष तुमच्यासाठी कर्तव्यकाळ : पंतप्रधान
आमच्या सरकारने 10 वर्षाच युवकांना व्यासपीठ देण्याचे प्रयत्न केला आगे. योजनांच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचा प्रयत्न केल आहे. गेल्य सरकारच्या काळात आम्ही तीनपट काम आहे. युवकांसाठी नवी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.आधुनिक शिक्षणासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू केले आहे. भारातातील विमानतळे ही जगातील मोठ्या विमानतळइतरकी सक्षम आहेत. चांद्रयान आदित्य एल 1 चे यश जगसोमरहे.युवकांना त्यांची स्वप्न मोठी करण्याचा काळ आहे. यासाठी युवकांना त्यांची आव्हानं निश्चित करावी लागली. भारताला आत्मनिर्भरता सिद्ध करायचे आहे. भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायची, हे आपले लक्ष्य आहे. जगभरात भारताचे नाव अभिमानाने घेतली जातेय. महासत्ता म्हणून भारत नावारुपास येत आहे. त्यामुळे पुढील 25 वर्ष तुमच्यासाठी कर्तव्यकाळ आहे . भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत युवकांचा मोठा सहभाग आहे.
तरुणांनी सक्रिय राजकारणात यावं, परिवारवाद संपेल : मोदी
देशाची युवा पिढी तयार होत आहे, गुलामी आणि तणावापासून मुक्त आहे. आता युवा पिढी म्हणते विकास आणि विरासत. सरकारने अनेक योजना राबवून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. भारत ही लोकशाहीची माता आहे. जर तुम्ही सक्रीय राजकारणात आलात, तर परिवारवादाच्या राजकारणाला कमी कराल. परिवारवादाच्या राजकारणाने देशाचं नुकसान केलंय.
युवक आपल्या लोकशाहीत उर्जा आणू शकतील. युवकांनी मतदारयादीत नाव आल्यानंतर देशासाठी मतदान करावं. देशाचा अमृतकाळ हा परिवर्तनकाळ आहे.
कोरोनाकाळात जगाने भारताची ताकद पाहिली : पंतप्रधान मोदी
कोरोनाकाळात जगाने भारताची ताकद बघितली. सर्व भारतीयांना वॅक्सीन देऊन त्यांना डिजीटल सर्टिफिकेट दिले. भारतात आज इतका स्वस्त मोबाईल डेटा उपलब्ध आहे, जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देशाचा मिजास युवा आहे आणि देशाचा अंदाजही युवा आहे. जो युवा असतो तो मागे हटत नाही, आघाडीवर असतो. आज टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत आघाडीवर नेतृत्व करत आहे. चांद्रयान, मेड इन इंडिया आएनएस विक्रांत अशा योजनांमुळे भारताचा उर अभिमानाने भरुन येतो.
भारत टॉप 5 अर्थव्यवस्था
आज भारत जगातील टॉप पाच अर्थव्यवस्थेमध्ये आहे. ही भारताच्या युवकांच्या ताकद आहे. आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.