Hindu Jan Akrosh Morcha नाशिक : भारतात रेल्वे आणि संरक्षण दलानंतर सर्वाधिक जागा ही मुस्लिम धर्मीयांच्या 'वक्फ' बोर्डाकडे आहे. 'वक्फ' बोर्डाच्या नावाखाली हिंदूंच्या जागांवर कब्जा केला जात आहे. पण, देशात आता हिंदूंचे सरकार असल्याने यापुढे अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे. 


वक्फ बोर्ड रद्द झालेच पाहिजे, अल्पसंख्याकांचे अतिक्रम हटवावे, दहशवाद्यांना पोसणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा हलाल सर्टिफिकेट देणे बंद करावे, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा (Hindu Jan Akrosh Morcha) काढण्यात आला. हा मोर्चा सीबीएस (CBS) येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. 


हा कायदा तातडीने रद्द करावा


नितेश राणे म्हणाले की, जगातील इस्लामिक देशांमध्ये नसलेला वक्फ कायदा हा केवळ भारतामध्ये लागू आहे. या वक्फ कायद्याच्या माध्यमामधून देशाला इस्लामिक करण्याचे कारस्थान आहे. परंतु, ९० टक्के हिंदू असलेल्या भारतात हा प्रकार होऊ देणार नाही. देशात केवळ भारतीय संविधान लागू असून, आम्हाला वक्फ कायदा मान्य नाही. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी राणे यांनी केली. 


हिंदू बांधवांनो, पेटून उठा!


या वक्फ बोर्डात एकही हिंदू नाही. याविरोधात लढा देणे आवश्यक आहे. जेथे या बोर्डाची माणसे जमीन मागायला येतील, तेथे हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. हिंदू बांधवांनो, पेटून उठा ! ‘त्यांचा अली, तर आमचा बजरंगबली’ ही घोषणा कायम लक्षात ठेवा. भारतात सीरिया आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे शरीयत कायदा लागू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 


...तर बजरंग बलीचे मंदिर उभारा


हिंदूंनी वेळीच डोळे उघडले नाहीत, तर हे संकट आपल्या दाराशी आल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर दादागिरी चालणार नाही. संविधानाप्रमाणे देश चालतो; पण सिव्हील न्यायालयाइतके अधिकार ‘वक्फ’ बोर्डाला बहाल केले आहेत. त्यांच्या नावाने कुणी जमीन बळकावली तर त्या जागेवर लगेच बजरंग बलीचे मंदिर उभारा, असा सल्लाही त्यांनी दिला.


‘ईद’च्या दिवशी मालेगावला जाणार


मालेगावमधील किल्ल्याबाहेरील अतिक्रमण हटविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. येथे स्वतंत्र पोलिस चौकीही उभारण्यात येईल. याची पाहणी करण्यासाठी ‘ईद’च्या दिवशी आपण मालेगावला जाणार असल्याची घोषणा आमदार राणे यांनी केली. 


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना धमकीचं पत्र नेमकं कुठून आलं? समोर आली मोठी अपडेट