Nashik News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik Dsitrict) पाच देवस्थानांच्या अध्यक्षपदी नाशिकमधील अतिरिक्त सत्र न्यायाधिशांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी हे आदेश काढले आहेत. त्यानुसार त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरासह सप्तशृंगगड, काळाराम मंदिर, रामदास स्वामी मठ, व्यंकटेश बालाजी मंदिर, पंचवटी येथील नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. 


त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या (Trimbakeshwer Mandir) अध्यक्षपदी नाशिकचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. व्ही. जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायाधीश विकास कुलकर्णी यांची बदली झाली आहे. अलीकडेच म्हणजे दोन जूनला त्यांनी येथील पदभार सोडल्याचे समजते. त्यामुळे आता त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदाचा कारभार कारभार न्यायाधीश जीवने हे स्वीकारणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्रधान सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे विद्यमान विश्वस्तांची पंचवार्षिक मुदत तीन जुलै रोजी संपणार आहे.


नाशिक जिल्ह्यातील पाच देवस्थानांच्या अध्यक्षपदी नाशिकमधील अतिरिक्त सत्र न्यायाधिशांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी हे आदेश काढले आहेत. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर, नाशिकमधील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी न्यायाधीशांच्या बदल्या झाल्यानंतर पाच देवस्थानांची अध्यक्षपदे रिक्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगगड (Saptshrungi Devi Mandir), काळाराम मंदिर (Kalaram Mandir), रामदास स्वामी मठ आणि व्यंकटेश बालाजी मंदिराच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 


एप्रिल महिन्यात राज्यातील 88 जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले होते. त्यात नाशिक जिल्ह्यातील आठ न्यायाधीशांचा समावेश होता. उन्हाळी सुट्यांनंतर आता नवनियुक्त न्यायाधीश हजर होत आहेत. त्यानुसार अध्यक्षपदासंदर्भात आदेश निर्गमित झाले आहेत. दरम्यान, अतिरिक्त सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांच्या बदलीमुळे त्र्यंबकेश्वर, उमेशचंद्र मोरे यांच्या बदलीमुळे श्री काळाराम मंदिर, तर वर्धन देसाई यांच्या बदलीमुळे सप्तशृंगगड देवस्थानचे अध्यक्षपद रिक्त होते.



पाच देवस्थानांना मिळाले नवे अध्यक्ष


प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी हे आदेश काढले आहेत. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर, नाशिकमधील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी एन. व्ही. जीवने, सप्तशृंग देवी मंदिर अध्यक्षपदी बी. व्ही. वाघ,  काळाराम मंदिर अध्यक्षपदी एम. आय. लोकवाणी, रामदास स्वामी मठ अध्यक्षपदी जे. एम. दळवी, पंचवटीतील व्यंकटेश बालाजी मंदिर अध्यक्षपदी जी. पी. बावस्कर यांची निवड करण्यात आली आहे.