Nashik Water Storage : एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत (Heat) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नाशिकमध्ये 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. तीव्र उन्हाळ्याचे आगामी 70 दिवस बाकी असताना जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठी केवळ 31 टक्केच शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच लहान-मोठ्या 23 धरणांत 20,561 दशलक्ष घनफूट (31.31 टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के साठा कमी आहे. गंगापूर धरणात (Gangapur Dam) 47 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गतवर्षीपेक्षा 10 हजार दशलक्ष घनफूट जलसाठा कमी
धरणांतील जलसाठ्याचे घटते प्रमाण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आज धरणांमध्ये गतवर्षापेक्षा 10 हजार दशलक्ष घनफूट जलसाठा कमी आहे. गेल्यावर्षी एप्रिल प्रारंभी धरणांत 30,540 दशलक्ष घनफूट (46.51 टक्के) जलसाठा होता. चालू वर्षी एक-दोन धरणांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच धरणांतील साठा निम्म्याहून कमी झाला आहे.
कुठल्या धरणात किती साठा?
पालखेड धरणात (61 टक्के) व नांदूरमध्यमेश्वर बंधारा (98) वगळता कोणत्याही धरणात 50 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा नाही. काश्यपीत 844 दशलक्ष घनफूट (45 टक्के), गौतमी गोदावरी 702 (37 टक्के), आळंदी 304 (37 टक्के), करंजवण 1,325 (24 टक्के), ओझरखेड 449 (21 टक्के), दारणा 1,760 (24 टक्के), मुकणे 2,221 (30 टक्के), वालदेवी 481 (42 टक्के), चणकापूर 711 (29 टक्के), हरणबारी 455 (39 टक्के), गिरणा 5,790 (31 टक्के), पुनद 999 दशलक्ष घनफूट (76 टक्के) असा जलसाठा शिल्लक आहे.
जिल्ह्यात 210 टँकरद्वारे पाणीपुरवठा
दरम्यान, जिल्ह्यात पाणीटंचाईची (Water Scarcity) समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील (Rural Area) रहिवाशांकडून टँकरद्वारे (Water Tanker) पाणीपुरवठ्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात सध्या 210 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 203 गावे आणि 436 वाड्या अशा 639 ठिकाणी 210 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक 49 टँकर नांदगाव (Nandgaon) तालुक्यात, तर 45 टँकर येवला (Yeola) तालुक्यात तहान भागविण्याचे काम करीत आहेत.
अशी आहे तालुकानिहाय टँकरस्थिती
तालुका | गावे | टँकर |
बागलाण (Baglan) | 32 | 25 |
चांदवड (Chandwad) | 68 | 26 |
देवळा (Deola) | 53 | 25 |
मालेगाव (Malegaon) | 74 | 24 |
नांदगाव (Nandgaon) | 269 | 49 |
सिन्नर (Sinnar) | 76 | 16 |
येवला (Yeola) | 67 | 45 |
इतर महत्वाच्या बातम्या