Maharashtra Nashik Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर देवस्थान (Trimbakeshwar Jyotirling Mandir) हे केंद्रीय संरक्षित स्मारक असल्यामुळे येथे सुरू करण्यात आलेले व्हीआयपी पेड दर्शन (VIP Paid Darshan) चुकीचे असून, ते प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे ते तात्काळ बंद करावे, तसेच यासह विविध सूचना भारतीय पुरातत्त्व खात्याने (Indian Archaeological Department) त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या (Trimbakeshwar Jyotirling Mandir Trust) अध्यक्षांना पाठविले आहे.


त्र्यंबकेश्वर (Trambkeshwar News) येथील मंदिराला भारतीय पुरातत्त्व खात्याचे डी.एस. दानवे, दीपक चौधरी आणि सुपरिटेंडिंग आर्कियॉलॉजिस्ट यांच्या समितीने 15 मार्च रोजी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांना आढळलेल्या काही बाबींबाबत 16 मार्च रोजी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रामध्ये वरील बाब स्पष्ट करण्यात आली आहे.


पत्रामध्ये पुढे म्हटले आहे की, महाशिवरात्रीसाठी मंदिराच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले अडथळे आणि तात्पुरती दर्शनबारी हटविण्यात यावी, तसेच मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी ठेवलेल्या दानपेट्या आहेत. दानपेट्या हटविण्यात याव्यात, तसेच दानाची रक्कम जमा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या केबिनही हटविण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने करण्यात आली आहे. मंदिराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये काही बिनकामाचे सामान ठेवले आहे, ते तातडीने हटविण्याच्या सूचनाही या पत्रातून मंदिर ट्रस्टला करण्यात आल्या आहेत. 


त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) सुरु करण्यात आलेल्या पेड दर्शनाबाबत उच्च न्यायालयात (High Court) याचिका प्रलंबित असून न्यायालयाकडून याबाबत न्याय मिळेल याची खात्री आहे. पुरातत्व खात्याने केलेल्या सूचनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्या ललिता शिंदे यांनी म्हटले आहे. 


हे पत्र अद्याप आमच्या बघण्यात आलेले नाही. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुरु करण्यात आलेले पेड दर्शन हे ऐच्छिक असून, याबाबतचा निर्णय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे त्याबद्दल आताच काही निर्णय करणे उचित होणारे नसल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी म्हटले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Trimbakeshwar Jyotirling Mandir : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फाचं कोडं अखेर सुटलं, मंदिर पुजाऱ्यांचा प्रताप