Nashik ST Bus Accident News: नाशिक पुणे महामार्गावर बस अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. अपघाताची कारण शोधण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात अली असून त्याची कारणमीमांसा केली जाणार आहे.  मात्र गेल्या काही महिन्याची आकडेवारी बघितली तर एसटीचा प्रवास हा सुरक्षित आहे की धडकी भरविणारा असा सवाल उपस्थित होत आहे. अपघाताच्या इतर कारणा बरोबरच बसची देखभाल दुरुस्ती नसणे हे देखील मुख्य कारण समोर येत आहे. नऊ महिन्यात नाशिकमध्ये 119 एसटी अपघात झाले आहेत. एस टी चालक रोजच जीव मुठीत धरून प्रवास करत असतात त्यांच्याच नाहीतर त्यांच्या  बरोबर असणाऱ्या प्रवाश्यांच्या जीवाची जबाबदारी ही त्यांच्या हाती असते. वेळेवर घडलेले काही अपघात टाळता येणे शक्य नसले तरीही अनेक अपघात वेळीच खबरदारी घेतली गाड्यांच्या मेन्टन्सस ठेवला तर ते टाळता येऊ शकतात करवाईच्या भीतीने कर्मचारी बोलण्यास धजावत नाहीत. मात्र ही जरब अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यावर न दाखवता कामकाजावर दाखवली तर अपघात टाळता येऊ शकतात.


नाशिक पुणे महामार्गावर पळसे गावाजवळ एक बस दुसऱ्या बसवर आदळली, या अपघातात या अपघातात मागून येणाऱ्या बससोबत फरफटत जाणारे दुचाकीस्वाराचा  जागीच होरपळून मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बस संपूर्ण जळून खाक झाली असून केवळ सांगाडा उरला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी अपघाताची कारणं काय? याचा निष्कर्ष लावता येत नसल्यानं अपघाताची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलीय. मागील नऊ महिन्यात नाशिक विभागात 119 अपघात झालेत. तर राज्यभरात हाच आकडा 1500 च्या जवळपास जातोय. चालकाचा बसवरील ताबा सुटणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, रस्त्याच्या परिस्थित्तीकडे दुर्लक्ष करणे अचानक एखादे वाहन किंवा व्यक्ती आडवे येणे, ही प्रमुख कारण सांगितली जात असली तरीही बसची देखभाल दुरुस्थीचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर झालाय. चालकाच्या केबिनमधील इतर बोर्डवरील इतर ना दुरुस्त असल्यानं गाडीच्या फिटनेसबाबत चालकाला माहिती मिळत नाही एवढच काय तर बसण्यासाठी तुटके सीट, वायरिंग आच्छादन नाही गाडी बंद करणासाठी दोरीचा पवापर करावा लागत असलायचं एबीपी माझाच्या पाहणीत उघडकीस आला. महामंडळाचे अधिकारी मात्र गाड्याची नियमित देखभाल दुरुस्ती होत असलायचा दावा करत आहेत. गुरुवारी झालेला अपघात बस तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या चुकीमुळे याचा शोध घेणं बाकी असल्याचा खुलासा महामंडळाकडून केला जातोय.