Nashik Purohit Sangh : श्री गंगा-गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या (Sri Ganga Godavari Panchkoti Purohit Sangh) कार्यकारिणी फलक लावण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या वादात पंचाक्षरी आणि सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अखेर पोलिसांनी यात हस्तक्षेप करत धरपकड केली.

Continues below advertisement


पुरोहित संघाच्या कार्यालयाबाहेर कार्यकारिणीचा फलक लावण्याचा प्रयत्न केला जात असताना एका गटाने त्याला विरोध दर्शवला. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गटांचे सदस्य आणि पदाधिकारी आमनेसामने आले आणि बाचाबाचीला सुरुवात झाली.


पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला


त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला. पोलिसांकडून दोन्ही कार्यकरणीस पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे पंचवटी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. यानंतर पुन्हा पुरोहित संघातील वाढ अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


सतीश शुक्ल यांच्याकडून 23 जणांची नवीन कार्यकारिणी जाहीर


दरम्यान, श्री गंगा-गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यासंदर्भात रविवारी (दि.27) सतीश शुक्ल यांनी पत्रकार परिषद घेत 23 जणांची नवीन कार्यकारिणी जाहीर केली होती. सतीश शुक्ल यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी सतीश शुक्ल म्हणाले, चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी निवडणूक घेऊन स्वतःला अध्यक्ष म्हणून सिद्ध करून दाखवावे, त्यामुळे दोन्ही गटांतील वाद तूर्तास तरी मिटणार नसल्याचे चित्र आहे. सतीश शुक्ल म्हणाले, आमचाच पुरोहित संघ अधिकृत असून, दुसऱ्या गटाकडून आम्ही बैठका, पत्रकार परिषद घेऊ नये म्हणून धमक्यांचे मेसेज पाठवले जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या गटातील अनेक जण शरीराने त्यांच्यासोबत परंतु मनाने आमच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


पुरोहित संघाच्या शासनाकडे प्रमुख मागण्या


साधुग्रामसाठी पाचशे एकर जागा, स्वच्छ व प्रवाहित गोदा, भाविकांच्या राहण्याची सोय आदी मागण्या शासनाकडे केल्या असून, त्याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे शुक्ल यांनी यावेळी सांगितले, तसेच शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था यांना एकत्र आणत कुंभमेळा योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी मेळावा घेऊ, असेही शुक्ल यांनी सांगितले. 



आणखी वाचा 


Nashik Crime : नाशिकमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरी जीएसटीचा छापा, दोन पेट्या भरून कोट्यवधींच्या कोऱ्या करकरीत नोटा सापडल्या