नाशिक : शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि कुख्यात दहशतवादी सलीम कुत्ता (Salim Kutta)  पार्टी प्रकणात मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी सलीम कुत्ताची येरवडा कारागृहातून (Yerwada Jail)  माहिती मागवली आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी सलीम कुत्ता 25 एप्रिल ते 24 मे 2016 पर्यंत पेरोलवर होता. कारागृहात जाताजाता त्याने नाशिकच्या (Nashik) आडगाव परिसरातील सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकाच्या फार्महाऊसवर आयोजित पार्टीत 24 मे रोजी हजेरी लावली आणि 11 वाजून 50 मिनिटांनी तो नाशिक कारागृहात (Nashik Jail) हजर झाल्याचे आतापर्यंतच्या  तपासात उघड झालंय .


 दहशतवाद्यांसोबत उबाठा गटाचा पदाधिकरी पार्टी करत असलायचा व्हीडिओ  विधिमंडळ अधिवेशनात सादर करून आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. तेव्हा पासून या प्रकरणाची चौकशी केली जात असून आतापर्यत 18 ते 19 जणांची चौकशी करण्यात आलीय. या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची सहा वेळा चौकशी करण्यात आली असून बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या संबंधाचे धागेदोरे शोधण्याचे काम क्राईम ब्रान्चकडून केले जात आहे. नाशिक कारागृहा पाठोपाठ नाशिक पोलिसांनी येरवडा कारागृहाशी संपर्क साधून  सलीम कुत्ता संदर्भात माहिती सांकलीत करण्यास सुरुवात केली आहे.


बडगुजरांच्या उत्तराची नाशिक पोलिसांना प्रतीक्षा 


 पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सलीम कुत्ताची  नाशिकहून डिसेंबर 2016 मध्ये येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्याची कारागृहातून सुटका झालेली नाही. गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत सलीम कुत्ताला भेटण्यासाठी त्याची पत्नी कुटुंबीय आणि वकील गेल्याची प्राथमिक माहिती नाशिक पोलिसांना प्राप्त झाली आहे. अद्याप सलीम कुत्ताचा जबाब नाशिक पोलिसांनी घेतलेला नाही .बडगुजर आणि इतर साक्षीदारांच्या तपासात काय निष्पन्न होते त्यानुसार सलीम कुत्ताचा जबाब आणि इतर  कायदेशीर  कारवाई केली जाणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान मागील तीन  चार दिवसापासून बडगुजर यांची चौकशी झालेली नाही. वकिलाच्या मदतीने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर  बडगुजर देणार असल्यानं  त्यांच्या  उत्तराची नाशिक पोलिसांना प्रतीक्षा आहे. 


हे ही वाचा :


सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांच्या पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, व्यंकटेश मोरेचा फोटो दाखवत राऊतांची चौकशीची मागणी