नाशिक :  सलीम कुत्ताची (Salim Kutta)  सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यासोबत पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट  भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे हा 'त्या' पार्टीचा आयोजक असल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दावा केला आहे. व्यंकटेश मोरेचे (Vyanktesh More)  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्यासह नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवत संजय राऊतांनी  गौप्यस्फोट केला आहे. सलीम कुत्ताला पॅरोल कोणी दिला होता? तेव्हा गृहमंत्री कोण होते ? असाही प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.


संजय राऊत म्हणाले. आमची जी माहिती आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील व्हिडीओ सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचं बोललं जातंय. कुठलातरी व्हीडिओ कुणीतरी दिला. म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई होणं चूक आहे. आपला कायदा अशा पद्धतीने काम करतो? मुळात तो व्हीडिओ बडगुजर यांच्या कुटुंबाने दिलाच नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो. बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत आहे. त्यांची मी कधी शपथ घेत नाही. पण आज त्यांची शपथ घेऊन सांगतो. त्या व्हिडीओशी सुधाकर बडगुजर यांचा काहीही संबंध नाही, असं संजय राऊत म्हणालेत.


कोण आहे व्यंकटेश मोरे ?



  •  व्यंकटेश मोरे हा भाजप कामगार मोर्चाचा नाशिक लोकसभा संयोजक आहे

  •  व्यंकटेश मोरेवर नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत 

  • खूनाच्या गुन्ह्यात व्यंकटेश मोरेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे 


बावनकुळे यांचा व्हिडीओ कुणी दिला?


भाजपच्या लोकांनी आपआपसात विचारलं पाहिजे बावनकुळे यांचा हा व्हीडिओ कुणी दिला ते… त्यांना चांगलंच माहिती आहे की बावनकुळे यांचा व्हीडिओ नेमका कुणी दिला. हा व्हिडीओ आमच्यापर्यंत कसा आला हे भाजप आणि संघ परिवाराला माहिती आहे. विशेषत: नागपूरच्या लोकांना माहिती आहे की, हा व्हिडीओ आम्हाला कुणी दिला ते… विनाकारण बडगुजर कुटुंबावर आरोप करू नका, असं संजय राऊत म्हणालेत.


गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा : संजय राऊत 


सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचे आयोजन भाजप पदाधिकाऱ्याने केले होते. व्यंकटेश मोरेच्या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्या (कुत्ता) संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा, असेही संजय राऊत म्हणाले. 


हे ही वाचा :