Nashik Sanjay Raut : आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे. त्यांच्यावर दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणतात अमृतकाळ सूरु आहे. हाच त्यांचा अमृत काळ असून सूड आणि बदलाचे राजकारण केले जात असल्याची गंभीर टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. 


संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते मालेगाव (Malegaon) दौऱ्यावर जात असून रविवारी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा होत असल्याने पाहणीसाठी ते आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले कि, आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे, त्यांच्या चूक शोधून काढतात, आणि नसलेल्या चुकाना मोठे स्वरूप देऊन कारवाया केल्या जातात. दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदी म्हणतात अमृतकाळ सूरु आहे. हाच त्यांचा अमृत काळ असून सूड आणि बदलाचे राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले. 


किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्या ट्विटवर संजय राऊत म्हणाले कि, मुंबई विद्यापीठ, न्यायालय, ईडी, सीबीआय यांच्यावर किती विश्वास ठेवायचा अशी आज परिस्थिती आहे. ही सगळी त्यांची दुकानदारी असून सगळ्या यंत्रणा एका राजकीय पक्षाच्या सत्तेच्या टाचेखाली काम करतात, हे कालच्या सुरतच्या निकालावरून स्पष्ट झाले.  ईडी, सीबीआय आणि शैक्षणिक संस्था देखील कश्या कोणाच्या दबावाखाली काम करतात हे देखील स्पष्ट झाले असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यावर म्हणाले कि, जस त्यांच्या नेत्यांचा भाषण स्क्रिप्टड होते, तस आहे का? शिवसेनेला स्क्रिपटेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाही. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वातंत्र्य बुद्धीने विचाराने काम करतो. आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा असून आम्हाला दुसऱ्यांची डोके कामाला लागत नाही, टोला मनसेला लगावला आहे. 


सूड आणि बदलाचे राजकारण.... 


ईडी, सीबीआय या संदर्भात चौदा पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात शिवसेना देखील आहे. त्यात चुकीचे काय? असा सवाल करत सर्वच यंत्रणा आजच्या सत्ताधाऱ्यांच्या गुलाम झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. भ्रष्टाचार एकाच पक्षाचा नसतो. सत्तेवर जे असतात, त्यांचा भ्रष्टाचार जास्त असतो. आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे त्यांच्या चूक शोधून काढतात,आणि नसलेल्या चुकाना मोठे स्वरूप देऊन कारवाया केल्या जातात. दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदी म्हणतात अमृतकाळ सूरु आहे. हाच त्यांचा अमृत काळ असून सूड आणि बदलाचे राजकारण केले जात आहे. 


ईव्हीएमसंदर्भांत दिल्लीत सर्वपक्षीय बैठक.... 


दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. याबाबत संजय राऊत म्हणाले कि, कालची बैठक निवडुन आयोग जस काम करत आहे. इलेक्शन कमिशन लोकशाहीचा मोठा कणा असून मात्र मोदी सरकरने लोकशाहीचा कणा मोडून काढला. ज्या बाबतीत शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. निवडणूक आयोगाने ही सरळ सरळ लफंगे गिरी, दरोडे खोरी सुरु आहे. त्याचबरोबर ईव्हीएमसंदर्भांत लोकांच्या मनात शंका असून कपिल सिब्बल यांनी पुढाकार घेतला आहे. इलेक्शन कमिशनची मनमानी सुरु असल्याने याबाबत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. ईव्हीएम संदर्भातली भूमिका आजची नाही. किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामी या दोन महान वीरांनीच  ईव्हीएमबाबत पहिले आवाज उठवला होता.  ईव्हीएम हा कसा घोटाळा आहे. याबाबत सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. किरीट सोमय्या यांनी बाळासाहेबांच्या उपस्थितीत हैद्राबादचे तज्ञ आणले होते. हा ईव्हीएम घोटाळा कसा आहे हे दाखवले होते. 


नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता.... 


दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शिक्षा झाल्याच्या संदर्भात राऊत म्हणाले कि, सरन्यायाधीश यांना मर्यादा असून राहुल गांधी यांना ज्या खटल्यात 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. ती नरेंद्र मोदी यांची बदनामी असेल असं वाटत असेल तर, नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता. चौथी पार्टी येते खटला दाखल करते, सुरत न्यायालय यावर निर्णय देते हा काय प्रकार? कशासाठी चालले हे सगळं? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द करावी, यासाठी हा सगळा आटा पिटा चालला असल्याचे सांगत विरोधकांवर दहशत निर्माण व्हावी, यासाठी हा सुरतचा निकाल असून मात्र संपूर्ण विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या सोबत असल्याचे संजय राऊत म्हणाले.