Nashik News : त्र्यंबकेश्वर येथील घटना नंतर हिंदू महासंघ (Hindu Mahasangh) आक्रमक झाला असून आज (17 मे) सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar Mandir) प्रवेशद्वारावर शुद्धीकरण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू महासंघासह अनेक हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे, नाशिक येथील हिंदू संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दोन दिवसांपासून नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणावरुन वातावरण चांगलंच तापले आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चार उरुस आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी उरुस निघाल्यानंतर आयोजकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केली केला आहे. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला आहे. अशातच आज हिंदू महासंघाकडून त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशद्वारावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर हिंदू संघटनांकडून पोलीस आणि मंदिर प्रशासनास निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे..


धूप दाखवण्याच्या निमित्ताने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न


13 मे रोजी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच असणाऱ्या दर्ग्यात संदलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आयोजित कार्यक्रमावेळी आयोजकांतील काही तरुणांनी धूप दाखवण्याच्या निमित्ताने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ रोखले. त्यावेळी पोलीस आणि मंदिर प्रशासनाने दोन्ही बाजूंनी समजूत घालत वाद मिटवला होता. मात्र त्यानंतर मंदिर प्रशासनाने घटनेच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनांला पत्र लिहले. त्यानंतर हा वाद वाढत गेला.


चार जणांवर गुन्हा दाखल


दरम्यान आज संजय राऊत यांनी देखील घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेले नाही. कुणीही जबरदस्तीने घुसलेले नाही. मात्र आज सकाळी हिंदू महासंघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण करण्यात आले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. काही जण त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करत असाल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केल्यानंतर आता चार उरुस आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या कलमाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 


उरुस आजोजकांचा दावा काय?


नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी तपासावर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या प्रकाराबाबत उरुस आयोजकांनी वेगळाच दावा केला आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील उरुसाची परंपरा अनेक वर्षांपासूनची असून उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजा पायरीजवळ डोक्यावरती फुलांच्या माळा घेऊन त्र्यंबकेश्वरला श्रद्धेने धूप दाखवण्याची प्रथा अनेक वर्षांपासून असल्याचा दावा सेवेकरी सलीम शेख यांनी केला आहे.