नाशिक : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील पानेवाडी (Panewadi) येथील काकड कुटबियांना आला आहे. एक वर्षाच्या चिमुरड्याने खेळताखेळता व्हिक्सची डबी गिळली होती. कुटुंबियांना याबाबत समजताच त्यांनी ही डबी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गळ्यातून डबी निघत नसल्याने त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. यानंतर मनमाड (Manmad) येथील डॉक्टरांना (Doctors) चिमुकल्याच्या गळ्यातून डबी काढण्यात यश आले.  मरणाच्या दारातून चिमुरडा परत आणल्याने कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. 


याबाबत अधिक माहिती अशी की, एक वर्षाचा चिमुरडा मल्हार काकड (Malhar kakad) या मुलाने खेळताखेळता व्हिक्सची छोटी डबी गिळली. यामुळे चिमुरड्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागला. हा चिमुरडा मरण्याच्या दारात पोहोचला होता. मात्र कुटुंबीयांना तातडीने त्यास मनमाडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 


चिमुकल्याने गिळली व्हिक्सची डबी


डॉक्टरांनी शर्थीचे व तातडीचे उपचार करत गिळलेली डबी बाहेर काढल्याने त्यास मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले. त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबीयांनी देवदूत अनुभवला. चिमुरड्या मल्हारने डबी गिळल्यामुळे पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या घशात जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याचा घसा पुर्णतः रक्ताने माखलेला होता. 


अथक प्रयत्नाअंती डबी काढण्यात डॉक्टरांना यश 


या काळात मल्हार याची ऑक्सिजन पातळी 36-36 पर्यंत खाली घसरली होती. तसेच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील 80 ते 90 टक्के बंद झाला होता. अशा दुहेरी आव्हानाला सामोरे जात कल्पकतेने डॉ. रजपूत बंधू यांनी शर्थीचे प्रयत्न करत डबी बाहेर काढून मल्हार याचे प्राण वाचविले. मरणाच्या दारातून चिमुरडा मल्हार परत आणल्याने काकड कुटुंबीयांना डॉक्टरांचे आभार मानले. यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, लहान मुले खेळता खेळता काय करतील याचा भरवसा नसतो. अनेक वेळा लहान मुलांनी शाळेत किंवा अगदी घरात खडू, पाटीवरची पेन्सिल वगैरे नाकात घातल्याचा घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये या आधीही एका चिमुकल्याने डबी गिळल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे लहान मुलांना दुखापत होईल अशा वस्तू त्यांच्यापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nashik Crime News : मालेगावात 'चड्डी बनियान' गँगचा धुमाकूळ, एकामागे एक सहा दुकानं फोडली, शहरात खळबळ


Nashik Crime : शेअर ट्रेडिंगचं आमिष भोवलं, बँक मॅनेजरला 40 लाखांचा गंडा तर तिघांची तब्बल 93 लाखांची फसवणूक