North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा इथे...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Mar 2024 05:45 PM
नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. मनसेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आज सकाळी राज ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली. आता राज ठाकरे त्यांच्या आजच्या दुसऱ्या सत्रातील दौऱ्यावर निघणार आहेत. ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच राज ठाकरेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा नाशिकमध्ये पक्ष प्रवेश देखील होणार आहे. 

जागतिक महिला दिनी पोलीस तृप्ती मुळीक यांनी केले मंत्री छगन भुजबळांच्या वाहनाचे सारथ्य

जागतिक महिला दिनी आज सिंधुदुर्ग ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा या मार्गावर महिला पोलिस तृप्ती मुळीक यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचे सारथ्य केले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सिंधुदुर्ग येथून परतत असतांना सिंधुदुर्ग ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा या दरम्यान तृप्ती मुळीक या महिला पोलिस यांनी  मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचे सारथ्य केले.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी घेतलं काळाराम मंदिराचं दर्शन 

नाशिक :  यंदा मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा (MNS Vardhapan Din) नाशिकमध्ये होत असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शुक्रवारी सकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती करण्यात आली तर अमित ठाकरे यांनी सपत्नीक महापूजा केली. 

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.