North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

North Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अनिरुद्ध जोशी Last Updated: 25 Jan 2024 06:49 PM
Nashik Crime News : नाशिकमध्ये तीन चोऱ्या अन् घरफोडी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकत्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तीन चोरीच्या व एक घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे ३ लाख ८७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. चोरी आणि घरफोडी रोखण्याचे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Dhule News : 27 जानेवारीला काँग्रेसचे बडे नेते धुळ्यात

आगामी निवडणुका महत्त्वाच्या असून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकांसाठी सज्ज झालो आहोत. आम्ही एकजुटीने या निवडणुका लढू व जिंकू, असा निर्धार आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. 27 जानेवारी रोजी धुळ्यात होणाऱ्या नाशिक विभागीय बैठकीत ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या मान्यवरांसह सर्व प्रदेश उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि पाचही जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

Chandanpuri Yatrotsav : चंदनपुरीच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण करीत, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट चा जयघोष करीत आज प्रति जेजुरी म्हणून संबोधल्या गेलेल्या नाशिकच्या मालेगाव येथील चंदनपुरी यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक महापूजा करत वाघ्या मुरळीसह खंडोबाची तळी भरली. 

Nashik Crime News : नाशकात तीन चोरीच्या घटना अन् घरफोडी

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.शहरात तीन चोरीच्या व एक घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे 3 लाख 87 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News : 25 अनुकंपाधारकांना मिळणार नियुक्तीचे पत्र

नाशिक जिल्ह्यातील 25 अनुकंपाधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास 525 लाभार्थींना गेल्या वर्षभरात लाभ मिळाला आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 

Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर

गेल्या महिन्याभरापासून नाशिकमध्ये राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. नाशिक राजकीय महत्व अलीकडे वाढले आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये त्यांचा जंगी रोड शो झाला. याचा फायदा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी होणार असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यसह राज्यातील आणि केंद्रातील प्रमुख मंत्र्यांनी याच महिन्यात नाशिकचा दौरा केला. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला न जाता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकला हजेरी लावली. नाशिकला काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा नाशकात पार पडली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अमित शाह हे नाशिकला सहकार परिषदेसाठी येणार आहेत. 

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांना अटकपूर्व जामीन मंजूर

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसीबीकडून दाखल गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. नगरसेवक पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी दोन वेळा बडगुजर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली होती. बुधवारी न्यायालाने निकाल जाहीर करून बडगुजरांना अटकपूर्व जामीन मंजूर केले आहे. 

Nashik Onion : कांद्याचे दर पुन्हा गडगडले

येथील बाजार समितीत कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. कांद्याला सरासरी 1 हजार ३१० रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. 

Jalgaon Crime News : आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्यासह साथीदारास बेड्या

जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, धुळे, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या एका साथीदारास अटक करण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. हे दोघे जळगाव शहरात पिंप्राळा हुडकोत भाड्याच्या घरात टोळीसोबत राहत होते. रामानंदनगर पोलिसांनी टोळीतील दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. 

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.