North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या राजकीय बातम्या, आर्थिक, क्रीडा, सामाजिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत. स्पर्धेला रविवारपासून (दि. 04) प्रारंभ होत असून, या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलीस आयुक्तालय करीत आहे. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस खेळाडू सहभागी होत आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे पोलीस क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. या वेळी स्पर्धांना प्रारंभ झाला असून, गेल्या डिसेंबरमध्ये विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा परिक्षेत्रानिहाय पार पडल्या. त्यानंतर आता राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा होत आहेत. या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत.
अहमदनगर येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर उद्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येथील असा दावा आयोजकांकडून करण्यात आलेला आहे . त्या अनुषंगाने अहमदनगरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.
क्रेडिट सोसायटीच्या नियमानुसार कर्ज न भरलेल्या सभासदांचे घर लिलाव विक्रीच्या आदेशाविरोधात दाखल याचिकेचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याच्या मोबदल्यात पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील दोघांची न्यायालयाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सहकार अधिकारी भीमराव ऊर्फ भूषण यशवंत जाधव (45) व सहाय्यक सहकार अधिकारी अनिल नथुजी घरडे (52) अशी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे १० ते १४ फेब्रुवारी यादरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर कृषी महोत्सव होणार आहे.कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे तीन रंगाचं हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका, असा हल्लाबोल खडसे यांनी केली आहे.
2014 साली मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदावर असावा, अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा? याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
पार्श्वभूमी
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या राजकीय बातम्या, आर्थिक, क्रीडा, सामाजिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -