North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाचे अपडेट्स, आर्थिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

अनिरुद्ध जोशी Last Updated: 30 Jan 2024 07:16 PM
Nashik Police : गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना पोलिसांनी केले परत

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजीपाला मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रीसाठी येणारे शेतकरी, विक्रेते व ग्राहक त्याचप्रमाणे रामकुंड भागात येणाऱ्या भाविकांचे मोबाईल गहाळ झाले होते.ते मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून मुळ मालकांना परत करण्यात आले आहे.

Nashik Crime : नाशिकला दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे जप्त

नाशिक-पुणे मार्गावरील इच्छामणी लॉन्सजवळ एक संशयित गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन कट्टे व तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

Nashik News : संरक्षण कायद्यासाठी नाशिकमध्ये वकीलांचे धरणे आंदोलन 

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेटस्‌ वेल्फेअर ॲक्टचा मसुदा तयार असूनही महाराष्ट्र शासनाकडून अद्याप तो मंजूर करून लागू करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे वकीलांवर जीवघेणे हल्ला होत असल्याने सदरचा कायदा लागू करण्यासाठी नाशिक बार कौन्सिलकडून जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Godavari Gaurav Puraskar : गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 10 मार्चला नाशिकमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. विविध क्षेत्रातील 6 मान्यवरांचा कुसुमाग्रजांच्या नगरीत सन्मान केला जाणार आहे. लोकसेवा, संगीत नृत्य, चित्रपट, ज्ञान विज्ञान, क्रीडा, चित्र शिल्प आशा विविध विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विवेक सावंत (ज्ञान), डॅा.सुचेता भिडे -चापेकर (नृत्य), सुनंदन लेले (क्रिडा), शामसुदीन तांबोळी (लोकसेवा ), आशुतोष गोवारीकर (चित्रपट), प्रमोद तांबोळी (चित्र शिल्प) यांना गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

Nashik Leopard News : इगतपुरी तालुक्यात बिबट्याचा तरुणीवर हल्ला

इगतपुरी तालुक्यातील निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे बिबट्याने आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास तरुणीवर हल्ला केला. यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मीनाक्षी शिवराम झुगरे असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Nashik : सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यक्रम आमदार, डॉ. भारती पवार यांचा कार्यक्षम खासदार म्हणून गौरव

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या माध्यमातून माजी आमदार व पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्षम आमदार व खासदार पुरस्काराचे वितरण नेहरू गार्डन परिसरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कार्यक्षम आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कार्यक्रम खासदार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

गोदा आरतीच्या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनास मिळणार बुस्ट - डॉ. भारती पवार

गोदा प्रकल्पाबाबत सुक्ष्म नियोजन करून यात आरतीसाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची व्यवस्था, आरतीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही. यासाठी प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, त्याचप्रमाणे आरतीचे लाईव्ह स्क्रिनिंगचे नियोजन सुत्रबद्धतेने झााले पाहिजे. गोदा आरती प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक पर्यटनाला बुस्ट मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी व्यक्त केला आहे.

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाचे अपडेट्स, आर्थिक,  सामाजिक, राजकीय, क्रीडा तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.