Nashik Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) नाशिकच्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च नायायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. काही वर्षांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उगारने भोवले होते. यानंतर या प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी एका वर्षांची शिक्षा सुनावली होती. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
आमदार बच्चू कडू प्रहार (Prahar) जनशक्ती पक्षाचे नेते असून विविध आंदोलनात सहभाग घेत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. अशातच 2017 मध्ये महापालिका कार्यालयावर आंदोलन (Protest) करण्यात आले होते. नाशिकचे तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा (Abhishek Krushna) यांच्या दालनात आंदोलकांनी ठिय्या केला होता. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी अभिषेक कृष्णा यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी Nashik Police) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 353 अंतर्गत दोषी ठरवत त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. कडू यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती कडू यांनी न्यायालयाला केल्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
दरम्यान, 2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत (Nashik NMC) आंदोलन केले होते. अपंगांसाठी राखीव निधी खर्च न केल्याबद्दल प्रहार अपंग क्रांतीने केलेल्या निदर्शनामध्ये कडू यांचा सहभाग होता. जमाव कार्यालयात गेला. त्यात कडू यांचाही समावेश होता. आयुक्त आणि जमावामध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडविला होता. मात्र सरकारवाडा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर नायालयाकडून बच्चू कडू यांना दिलासा देत 1 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आमदार बच्चू कडू यांनी 2017 ला दिव्यांगांच्या मागण्यांसाठी नाशिकच्या महापालिकेत आंदोलन केलं होतं. यावेळी बच्चू कडू यांनी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली होती. या प्रकरणामध्ये बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने 5 हजारांचा दंड आणि 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता या प्रकरणामध्ये बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यातील शिक्षेला स्थगिती देखील मिळाली आहे.