नाशिक : महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतायेत. बदलापूर येथे शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर राज्यभर शाळेतल्या मुलींचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये देखील पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने शाळा महाविद्यालयांच्या समित्या आणि संस्थाचालकांची काल बैठक घेतली. खाजगी आणि सरकारी शाळांच्या तुलनेत खाजगी शाळा या वरचढ दिसून आल्या. मात्र जिल्ह्यातील शाळेतील सुरक्षेचा आढावा घेत असताना नाशिक शहरातील खाजगी शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा महाविद्यालयांच्या संदर्भात तात्काळ योग्य त्या उपयोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग्य त्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयोजना करण्याच्या सूचना नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी यांनी वेळोवेळी दिल्या आहेत असे सांगितले. मात्र नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 80 आणि 81 शाळांची परिस्थिती नेमकी काय आहे ती पाहूया. शाळेमध्ये एकूण दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मात्र सध्या स्थितीला तीन ते चार सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याच निदर्शनास आले. तांत्रिक अडचणी अभावी काही सीसीटीव्ही बंद असल्याची कबुली शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 80 आणि 81 या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र काही प्रमाणात ते बंद स्वरूपाचे आहेत त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली. शाळेत गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्या नंतर शाळेतील स्मार्ट सिटी कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी तात्काळ सुरू करण्यात आली. तर दुसरीकडे शाळेमध्ये तक्रार पेटी असणे आवश्यक आहे मात्र ती स्मार्ट शाळांमध्ये तक्रारपेटीच गायब असल्याचा आढळून आलं.
शाळेत तक्रारपेटी नाही
शाळेमध्ये कुठलीही तक्रारपेटी नसल्याच पाहायला मिळालं. शाळेच्या पोर्चमध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळण्याची जागा आहे मात्र त्या ठिकाणी शाळेतील तक्रार मांडायला तक्रार पेटीच नाही. नाशिक महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेच्या कारणास्तव उपायोजना करण्यात आल्या असल्याचं पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं. तर दुसरीकडे काही ठिकाणी काम सुरू आहेत येत्या काळात ते सर्व काम पूर्ण केले जातील अशी देखील माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
'बदलापूर प्रकरण दाबण्याचं काम', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला फटकारलं म्हणाले, "जाड चामडीचे सरकार.."