नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बुधवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.


आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाला अपघात


आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज येवल्यामध्ये (Yeola) त्यांची जाहीर सभा पार पडली. सभा आटोपल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा ताफा येवल्याहून मनमाडकडे (Manmad) जाताना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुचाकीस्वाराने मागून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. कारला मागून धडक बसल्याने कारची काच फुटली. या प्रकारानंतर आदित्य ठाकरे यांचा ताफा मनमाड येथे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाला. 


अन्यथा एमपीएससीवाल्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे


दरम्यान, राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर परीक्षा पुढे ढकल्याणात आली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, वारंवार एमपीएससीकडून गैरप्रकाराची पाऊले का उचलली जातात? आंदोलनासाठी का थांबतात. आम्ही पाठींबा दिला, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. हा तरुणांचा विषय आहे. एकतर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध होत नाही. नोकऱ्या उपलब्ध होत नाही. त्यात स्पर्धा परीक्षांचा हा घोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार आहेत. याबाबत बेसिक प्लॅनिंग करावे अन्यथा एमपीएससीवाल्यांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. 


आदित्य ठाकरेंचे महायुती सरकारला आव्हान


तर येवला येथील जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे. 2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते. आता 1500 वर आलेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे सरकार पुन्हा येत नाही. आमचे सरकार येणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना (CM Ladki Bahin Yojana) पैसे वाढवून देणार आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आताच रक्कम वाढवून द्या, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल