Prithviraj Chavan: राज्यात बदलापूरमध्ये झालेली घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सरकारला चांगलंच फटकारलंय. बदलापूर येथील प्रकरण गंभीर आहे. राजकीय कार्यकर्त्यांमुळे प्रकरण दाबण्याचं काम केलं जातंय. कारवाई दडपण्याचं काम केलं म्हणून नाराजी आहे.  कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जाड चामडीचं सरकार आहे. प्रकरण दाबण्याचा काम केलं जातंय असं म्हणत फडणवीसांच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली.


आमची हाक सरकारपर्यंत जात नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलीयं. प्रकरण दडवण्याचा प्रयत्न केला जात असून आरोपीला शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणात निकम चांगले वकील आहेत मात्र लोकांना विश्वास हवा, कुटुंबाची हरकत नसेल तर हस्तक्षेप करण्याची गरज नाही असेही चव्हाण म्हणाले.


बदलापूर प्रकरणात कायदा सुव्यवस्था कोलमडली


बदलापूर प्रकरणात कायदा सुव्यवस्था कोलमडली असून कारवाई दडपण्याचे काम केले  जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात, आरोपीला फासावर लटकवू, मात्र, तो तुमचा अधिकार नाही. ही शाळा राजकीय विचारांची आहे. त्यामुळं हे प्रकरण दाबण्यात येतंय असेही ते म्हणाले. जाड चामडीचं हे सरकार आहे. घटना घडते, घडू शकते. यावर शिक्षा व्हायला हवी. असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


एमपीएससी आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...


केंद्र सरकारच्या बँकींग सेवेच्या परीक्षा सुरु आहे. काही अडचणी येऊ शकतात. अनेक अडचणी येत आहेत. दोन्ही परीक्षा क्लॅश होत आहेत हे माहित होते. परीक्षा लांबणीवर न्यायला हवी होती. मात्र, त्यांनी परीक्षा लांबला नाही. आता आंदोलन सुरु आहे. MPSC ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


महायुतीला देशातील आरक्षण हे रद्द करायचा आहे


राज्यात मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न तापलेला असताना महायुतीला देशातील आरक्षण रद्द करायचं आहे असं मोहन भागवत मागे म्हणाले होते. ते म्हणले होते आरक्षण आता भरपूर झाले, बास झाले आणि तुम्ही त्याच दिशेने पाऊल टाकत आहात, आता युपीएससीमध्ये लॅटरलचा जो विषय आहे की ४५ पदावर थेट भरती घ्यावी, ती कशा संदर्भात होती. तुम्हाला आरक्षण संपवायचं आहे. त्या संदर्भातच ना, राहुल गांधी यांनी जेव्हा त्या विरुद्ध आवाज उठवला त्यानंतर तुम्हाला ते मागे घ्यावं लागलं. त्यामुळे आता कुठल्या ना कुठल्या मागच्या मार्गाने तुम्हाला वर्ण व्यवस्था तुम्हाला निर्माण करायची आहे.


हेही वाचा:


Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी