Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील इंदिरानगर भागातून संतापजनक घटना समोर आली असून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर त्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील इंदिरानगर (Indiarangar) भागातील गजबजलेला परिसर असलेल्या वडाळा पाथर्डी रस्त्यालगत परिसरात नराधम बापाने स्वतच्या साडेचार वर्षांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार (Molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित यांचा 2017 मध्ये विवाह झाला असून पती दारू पिऊन मारहाण करतो, म्हणून फिर्यादी आई-वडिलांकडे माहेरी नांदगाव येथे निघून गेल्या होत्या. या दरम्यान, त्या 12 फेब्रुवारी 2013 मध्ये मालेगाव न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या होत्या. त्यावेळी न्यायालयात सुनावणीच्या वेळी पीडित मुलगी वडिलांना पाहून रडू लागली. तसेच, त्यांच्याकडे जाण्याचा हट्ट केला म्हणून काही दिवसासाठी मुलीला वडिलांबरोबर नाशिक येथे पाठवून दिले. मात्र 6 एप्रिल 2013 रोजी गावची यात्रा असल्याने फिर्यादी मुलीला घेण्यासाठी नाशिक येथे त्यांच्या बहिणीकडे आल्या होत्या. त्यावेळी मुलीला घेऊन वडील आले. परंतु त्यांनी फिर्यादीबरोबर मुलीला पाठवले नाही. त्यामुळे फिर्यादी पुन्हा नांदगावला परत निघून गेल्या. फिर्यादीची बहीण मुलीला घेऊन नांदगावला आले. तिने तिला वेदना होत असल्याचे सांगत होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हाळ्यामुळे त्रास होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन फिर्यादी महिलेने कानाडोळा केला. परंतु वेदना सुरूच असल्याने डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर मुलीसोबत गैरकृत्य झाल्याचे समोर आले. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या वडिलांवरोधातच अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावरून जाणाऱ्या, घराशेजारील महिलेची छेड काढण्याचा प्रकार समोर येत आहेत. अनेकदा घरात घुसून संशयितांकडून विनयभंग केल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे महिला वर्गात असुरक्षितेतची भावना निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने अशा संशयितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे. जेणेकरून रोजच घडणाऱ्या घटनांना आळा बसेल, मात्र हे चित्र कमी व्हायच्या ऐवजी वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन महिलांच्या सुरक्षेकरिता नेमकं काय उपाययोजना करत आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.