Nashik Leopard Attack: नाशिकमध्ये (Nashik) शुक्रवारी (दि. 14) दुपारी संत कबीरनगर (Sant kabirnagar) आणि कामगारनगर (Kamgar Nagar) भागातील मुख्य रस्त्यांवर बिबट्याने (Leopard) अचानक धुमाकूळ घातला. रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांवर हल्ला करणारा बिबट्या नंतर शहराच्या मध्यवस्तीत शिरला आणि दोन तासांपेक्षा अधिक काळ लपंडाव खेळत राहिला. या थरारक घटनेत दोन वनरक्षकांसह पाच नागरिक जखमी झाले. (Nashik Leopard Attack)

Continues below advertisement

बिबट्याचे सर्वप्रथम दर्शन संत कबीरनगराकडून कामगारनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर साडेतीन वाजता झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ वन विभाग (Forest Department) आणि नाशिक पोलिसांनी (Nashik Police) माहिती दिली. त्यानंतर बिबट्याने महात्मा नगर (Mahatma Nagar) आणि पारिजात नगर (Parijat Nagar) भागात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. बिबट्याच्या हल्ल्यात दोन वनरक्षकांसह तुषार आचारी (वय 22), बबन शिंदे (65), रंगनाथ दाबल (46), राहुल देवरे (47) आणि एक नागरिक जखमी झाले.

Nashik Leopard Attack: 'डार्ट' बसताच बिबट्याने धाव घेतली, अन्...

जखमी झालेल्या नागरिकांचा तातडीने रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. वनविभाग आणि पोलिसांनी बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सोसायट्यांच्या तळमजल्यावर जाळी लावल्या.  मात्र, त्याचवेळी बिबट्याने एका वनरक्षकास जाळीतून पंजा मारून जखमी केले. त्यानंतर काही सेकंदांत 'ट्रॅक्यूलाइज गन'द्वारे 'डार्ट' बसताच बिबट्याने धाव घेतली. मात्र, दहा-पंधरा पावले धाव घेतल्यानंतर तो बेशुद्ध झाला. या थरारक बचाव कार्यात मंत्री गिरीश महाजन देखील सहभागी झाले होते. यामुळे नाशिकमधील बिबट्याच्या थरारक हल्ल्याची घटना राज्यभरात गाजली.   

Continues below advertisement

Nashik Leopard Attack: दुसऱ्या बिबट्याची अफवा 

नाशिकमध्ये सात जणांना जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. मात्र,  परिसरात आणखी एक बिबट्या लपला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. त्यामुळे वनविभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बिबटयाचा शोध घेतला. पण दुसरा बिबट्या नसल्याची खात्री पटल्यानंतर वनविभागाकडून परिसरात जनजागृती करण्यात आली. वनविभागाने नागरिकांना सूचना दिल्या की, बिबट्या समोर दिसल्यास शांत उभे राहा, त्याला त्रास देऊ नका आणि लगेच वनविभागाला माहिती द्या. तसेच, रात्री उशिरा एकटे बाहेर फिरू नका, असे सांगण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Leopard Junnar Pune News: धावत्या वाहनांवर झडप घालण्याचा बिबट्याचा प्रयत्न, जुन्नरचं भयानक वास्तव सीसीटीव्हीत कैद, PHOTO

Pune : बिबट्याच्या दहशतीनं तरुण पोरांची सोयरीक जुळेना, मुली देण्यासाठी पालकांचा नकार, उत्तर पुण्यातील भयान वास्तव