Nashik Accident : नाशिक (NashiK) जिल्ह्यातील येवला तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा भीषण अपघाताची घटना घडली आहे. उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने दोन ऊसतोड मजुरांचा उसाखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ट्रॉलीच्या बेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने जॅक लावून दुरुस्तीचे काम सुरू असताना जॅक निसटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातातील जखमी मजूराला तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन उस हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. अपघातातील जखमी मजूराला तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्सया बसचा अपघात, सहा जण जखमी
नाशिकमध्ये दुसऱ्या एका ठिकाणी एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. मात्र, एसटी बसमधील सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी लगेच मदकार्य सुरु केले होते. तसेच अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम स्थानिक नगारिकांनी केला. यावेळी एसटी बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या.
नेमका कसा झाला बसचा अपघात?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी वरील देवळाच्या भावडे फाट्यानजीक साक्री आगाराची एसटी बस (MH 20 BL 2661) रस्त्यालगत पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील 36 प्रवाशांपैकी सहाजण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकहून नंदुरबारकडे जात असलेल्या बससमोर अचानक दुचाकी आल्याने चालकाने गाडी वाचवण्यासाठी ब्रेक मारून वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ता कटिंगमुळे एक बाजू बंद, तर समोर उतार असल्याने बसचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला पलटी झाली.अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ धाव घेत काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते.
महत्वाच्या बातम्या: