Nashik Latest news Update : गृहविभागाने राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व नाशिक शहर गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची मागील वर्षी बदली रोखण्यासाठी नाशिककर एकवटले होते. 


राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी राज्यसेवेतील तसेच पोलीस अधीक्षक पदावरील 24 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये अतिरिक्त अधीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  यात नाशिकच्या दोन महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये गुन्हेगारांना घाम फोडणारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची अखेर बदली झाली आहे. तसेच नाशिक शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविणारे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांची बदली आहे. दरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली औरंगाबाद येथील पोलीस गुन्हे अन्वेषण च्या पोलीस अधीक्षकपदी झाली आहे. तर तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांची बदली धुळ्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. 


पाटील यांची बदली नाशिककरांनी थांबवली!
दरम्यान मागील वर्षी झालेल्या बदल्यात पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा समावेश होता. मात्र त्यावेळी नाशिककरांनी एकत्र येत या बदली विरोधात आंदोलन उभारले होते. त्यामुळे हे प्रकरण थेट हायकोर्टात गेले होते. त्यावेळी पाटील यांची राज्याच्या गुप्त वार्ता विभागात उपायुक्तपदी बदली झाली होती. अधीक्षक पाटील यांच्या जागी शहाजी उमाप पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार होते. मात्र, त्या अगोदरच हायकोर्टाने स्थगिती दिल्यामुळे पोलीस अधीक्षक म्हणून सचिन पाटील नाशिकमध्येच थांबले होते. पोलिस अधिक्षक पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे सत्र राबविले होते.


क्रीडाप्रेमी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड
नाशिक पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी नाशिकमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर नाशिकमधील सायकलिंग स्पर्धांत  सहभागी होत असायचे. नुकतेच त्यांनी धुळे व्हाया मध्य प्रदेश अशी सहाशे किलोमीटरची सायकलिंग 40 तासांच्या मुदत ऐवजी 38 तासात पूर्ण केली. यामुळे ऑडस क्लब पॅरिसियर या संस्थेतर्फे त्यांना 'सुपर रॅन्डोनियर'  हा किताब मिळाला आहे.


आणखी वाचा :
Nashik News : नाशिकचे पोलीस उपायुक्त ठरले सायकलिंगचे 'सुपर रॅन्डोनियर', 38 तासांत पूर्ण केले सहाशे किलोमीटर