नाशिक : श्रावण महिन्यातील (Shravan Month) दुसरा सोमवारच्या आज दुपारपासूनच नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. उद्या सोमवारी पहाटे चार वाजताच मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. श्रावण सोमवार निमित्त देवस्थान ट्रस्टकडून चोख नियोजन करण्यात आले असून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिकहून (Nashik) दर वीस मिनिटाला त्र्यंबकेश्वरसाठी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 


बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer Mandir) येथे भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. त्यातही श्रावणमास सुरु झाला की, भाविकांच्या संख्येत नेहमीपेक्षा अधिक वाढ होते. त्यामुळे श्रावणात वाढणाऱ्या गर्दीचे नियोजन देवस्थानला करावे लागते. रांगेत उभे असलेल्या प्रत्येक भाविकांना दर्शन होईल, त्यांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांची गैरसोय होणार नाही, याकडे देवस्थानकडून लक्ष देण्यात येत असते. त्या दृष्टीने अनेक व्यवस्था यंदा देवस्थानकडून मंदिराच्या आवारात करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सोमवारनिमित्त (Shravani Somwar) मंदिरात महापूजा, अभिषेक, आरती आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 


श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढत असून दुसऱ्या सोमवारी मागील सोमवारपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून व्हीआयपी प्रवेशिकांना लगाम घालण्याची योजना आखण्यात आलेली आहे. व्हीआयपीना प्रवेश नसला तरीही शासकीय व्हीआयपींना प्रवेश देण्याचे नियोजन आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर अंतर्गत कोठी कार्यालयालगत विशेष व्हीआयपी कक्ष सुरू करण्यात आला आहे. व्हीआयपी कक्षाला जोडूनच आरोग्य सेवेचा कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच भाविकांच्या विश्रांतीसाठी मंदिराच्या आवारात एक मंडप टाकला आहे. 


नाशिकहून 20 मिनिटांनी बस व्यवस्था 


श्रा‌वणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे 30 ते 35 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारप्रमाणे आता दुसरा सोमवारीदेखील महामंडळने नियोजन केले आहे. तिसऱ्या सोमवारी वाढणारी गर्दी अन् फेरी बघून यात वाढ केली जाणार आहे. तिसऱ्या सोमवारसाठी सध्या तरी सुमारे 235 गाड्यांचे नियोजन केले आहे. गरज पडल्यास आणखी बसेस सोडण्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी जवळच्या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था केली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात  श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी होते. त्यानुसार नाशिक- 1 आगारातून 15, तर नाशिक- 2 आगारातून 15 बस सोडल्या जाणार आहेत. या यात्रेसाठी रविवारी 30, तर सोमवारी 35 बसेस उपलब्ध असणार आहेत. तर मनपाच्या सिटीलिंकच्या माध्यमातून रविवारी व सोमवारी नियमित बसेससह 20 जादा बस धावणार आहे. 


खासगी वाहनांना प्रवेश बंदी 


श्रावण सोमवारी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत शहरात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविक खासगी वाहनाने येत असतात. त्यामुळे येथे वाहनतळासाठी जागा अपुरी पडते. अशा वेळी या मार्गावर वाहतूक सुरू राहिल्यास एखाद्या भाविकास वाहनाचा धक्का लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने तसेच इतर सर्व खासगी वाहने इत्यादी वाहनांना दि. 2 ते 4 सप्टेंबर या काळात त्र्यंबकेश्वर गावात जाण्यास प्रवेशबंदी असेल. नाशिकमार्गे जाणाऱ्यांना खंबाळे येथे, जव्हारमार्गे जाणाऱ्यांना अंबोली व घोटीमार्गे जाणाऱ्यांना पहिणे येथे वाहनतळ व्यवस्था असेल. सर्व भाडोत्री, काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने इत्यादी वाहनांना तेथे थांबावे लागेल. त्यानंतर तिथून पुढे एसटी बसेस उपलब्ध असतील.



इतर महत्वाची बातमी :