नाशिक : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी थेट दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच आज सकाळी संजय राऊत यांनी पुन्हा या संदर्भात लवकरच पुरावे सादर करणार असल्याचे सांगितल्यानंतर हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. अशातच सुषमा अंधारे यांनी पुन्हा दादा भुसे यांची चौकशी करा असे सांगत दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा त्याचबरोबर ससूनचे माजी डीन काळे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा अशी मागणी केली आहे. तसेच माझ्याकडचे पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे. 


नाशिक येथील शिंदे गावातील ड्रग्ज प्रकरण आता चिघळू लागले असून यात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतल्याचे समोर आलं आहे. कालच सुषमा आंधारे यांनी थेट दादा भुसे यांचे नाव घेत संबंधित ड्रग्ज प्रकरणातील संशयितांना अभय दिले जात असल्याचा आरोप केला होता. यावेळी दादा भुसे यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत खुशाल चौकशी करा, असे प्रतिआव्हान दिले आहे.  तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले होते. त्यावर आज पुन्हा सुषमा अंधारे यांनी माध्यमांसमोर येत दादा भुसे यांच्या कॉलची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 


सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या की, दादा भुसे यांची चौकशी करा तसेच पुण्याच्या ससूनचे माजी डीन काळे, ससूनचे लॅन्डलाईन यांचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करा. तसेच ललित पाटील कोण हे मला माहित नाही असे भूसे सांगतात, पण ललित पाटील यांना मातोश्रीवर दादा भूसे घेऊन आले होते, हे खोटे आहे का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच आधीचे आणि आताचे अधिष्ठता आणि उपचार कऱणारे डॉक्टर यांची चौकशी करा.


ललित पाटील यांना आजार कुठला होता हे डिन सांगयला अडचण नसायला पाहिजे. बुडत्याचे पाय खोलात म्हणून डिनने सर्व माहिती दिली पाहिजे. ससूनच्या डिनला कारणे दाखवा नोटीस बजावली पाहिजे. एखादा माणूस 200 कोटींचा ड्रग्जचा कारखाना काढतो, 9 महिने ससूनमध्ये राहतो, त्यावर वरदहस्त असणारच इथली तरुणाई जर कुणी पोखरून काढत असेल तर मी प्रश्न विचारत रहाणार असल्याचे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 



सुषमा अंधारे नेमक्या काय म्हणाल्या? 


सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या की, नाना पटोले तसं नाव घेतात, धंगेकरांनीही नाव घेतलं होतं. दादा भुसे हे नाशिकचे आहेत, त्यांचे कॉल रेकॉर्ड का तपासले जात नाही. ललित पाटील कुठला आजार होता, म्हणून त्याला ऍडमिट केलं होतं. तो सलग 9 महिने ससूनमध्ये दखल होता. याच उत्तर ससूनच्या डिनने दिले पाहिजे. मागच्या नऊ महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. ललित पाटलाला ज्यांनी दाखल करून घेतले, त्या काळेचे कॉल रेकॉर्ड तपासा, ससूनचे कॉल रेकॉर्ड तपासा. ललित पाटील हा शांतपणे जात लेमन ट्रि हॉटेलकडे जात होता. या प्रकरणी ससूनचे डिन आणि काळे यांचीही चौकशी केली पाहिजे. डिन यामध्ये सहभागी आहे का? हे तपासानंतर समोर येईल. 


 


Dada Bhuse : अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत, आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा करणार; दादा भुसेंचा इशारा