नाशिक : 'सम्राट अशोक विजयादशमी' निमित्त नाशिक शहरातील त्रिरश्मी लेणीवर महाबोधिवृक्ष रोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले, त्याच वृक्षाच्या फांदीचे नाशिकमध्ये रोपण करण्यात येणार आहे. या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री, तसेच श्रीलंका, थायलंड, मलेशियासारख्या देशांतूनही महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे. 


साधारण पंचवीशे वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाली. त्यामुळे बोधीवृक्ष अतिपूजनीय असून याच  बोधी वृक्षाच्या एका फांदीचे रोपण नाशिक शहरात त्रिरश्मी लेणी येथील स्मारकात होत असल्याने जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व प्राप्त होणार आहे. सम्राट अशोक विजयादशमीच्या उचित्य साधून नाशिक शहरातील बुद्ध स्मारक त्रिरश्मी लेणी येथे हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासाठी गेल्या महिन्याभरापासून या महोत्सवाची तयारी सुरू असून उद्या अकरा वाजता या बोधिवृक्षाच्या फांदीची परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. 


बोधीवृक्षाचं महत्व काय? 


बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे. तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. 528 मध्ये अगदी कमी वयात ज्ञान प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले. तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. सम्राट अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथे लावली. दोन वर्षांपूर्वी त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात एका सामान्य उपासकाने बोधिवृक्षाची फांदी नाशिकला आणावी, असा प्रस्ताव मांडला होता. यानंतर प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर बोधिवृक्षाचे दोन वर्षानंतर नाशिकमध्ये रोपण होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.


कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर कोण कोण?


या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पुज्यनीय हेमरत्र नायक थेरो, मलेशिया देशाचे प्रमुख पुज्यनीय भिक्खु सरणांकर महावेरी, थायलंड देशाचे प्रमुख पुज्यनीय भिक्खू डॉ. पोचाय, कंबोडिया देशाचे महासंघराज पुज्यनीय भिक्खू समदेच प्रेह , श्रीलंका देशातील दंतधातू विहाराचे प्रमुख पुज्यनीय भिक्खू नाराणपणाचे आनंदा थेरो, श्रीलंका देशाचे महानायक पुज्यनीय भिक्खू डॉ चास्कन्दुवे महिंदास महानायके थेरो, महाराष्ट्र भिक्खू संघाचे सल्लागार प्राचार्य डॉ. भदन्त खेमथम्मी महास्थवीर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजित दादा पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव अंबेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


अठरा लाख रुपयांचा निधी 


त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात 24 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी शासनाकडून 18 कोटी 4 लाख 67 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून महोत्सवासाठी संपूर्ण भागाच्या सुशोभिकरणासाठी 8 कोटी 36 लाखांचा खर्च केला जाणार आहे. भिक्खु निवासस्थानाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यांच्या अनुषंगिक सुरक्षेसाठी साडेसात कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. 


कार्यक्रमामुळे वाहतूक मार्गात बदल


दरम्यान सदर कार्यक्रमासाठी देशासह विदेशांमधून व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच नागरिकांची ही गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक-मुंबई आग्रा रोडवरील क्लिक हॉटेल ते गरवारे पॉईंटपर्यंत इंदिरानगर समांतर रस्ता, फेम सिग्नल ते रविशंकर मार्गावरून थेट कलानगर मार्गे पाथर्डी फाट्यापर्यंत अवजड वाहनांना नो एन्ट्री असणार आहे. तर सर्व प्रकारचे वाहने क्लिक हॉटेल रॅम्पवरून मुंबई आग्रा महामार्गाने जातील. पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक थेट द्वारका सर्कलवरून पुढे उड्डाण पुलावरून मुंबईच्या दिशेने जाईल. गरवारे पॉईंटकडून येणारी अवजड वाहने रॅम्पवरून उड्डाणपुलामार्गे द्वारका चौकाच्या दिशेने जातील. पाथर्डी गावाकडून येणारी वाहने पाथर्डीफाटा येथून तास बोगद्यातून वळण घेत पुढे जातील. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Budhha Paurnima : पाच फुटांच्या शंभर बुद्ध मूर्ती, शंभर रथातून मिरवणूक; नाशिकमधील शंभर गावांना बुद्धमूर्तीचं दान