नाशिक : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात नवंनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत असून आता नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आल्याचे समोर आले आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणी सराफा व्यावसायिकाची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत. 


नाशिकचं ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असून राज्यातील तीन पोलिसांच्या टीम्स या प्रकरणात लक्ष घालत असल्याने वेगवगेळ्या ठिकाणाहून नवी माहिती समोर येत आहे. कालच संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालची नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी स्थानिक आमदारांना हफ्ते जात असल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हळूहळू हे प्रकरण उलगडत आहे. अशातच एक माहिती माहिती माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिकमधील सराफ व्यावसायिकाचा जात असल्याचे समोर आले असून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलने येथील सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तब्बल आठ किलोचे सोने खरेदी केले असून यापैकी 3 किलो सोने हस्तगत, उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


दरम्यान आता नाशिकचा सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर असून त्याच्याकडून ड्रग्सच्या पैशातून भूषण पाटीलने सोने खरेदी केल्याचं उघड झाले आहे. आठ किलो सोने खरेदी करून तो पसार झाला होता. आता पोलिसांनी संबंधित आठ किलो सोन्यापैकी 3 किलो सोने हस्तगत केले असून उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी आहे. हे उर्वरित सोने कुठे लपवले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकच्या कोणत्या सराफाकडून सोने खरेदी केले, याची चौकशी सुरू असून ललित पाटीलचे सराफ व्यावसायिकासोबतचे कनेक्शन उघड होणार आहे. तर आतापर्यंतच्या चौकशीत ललित पाटील हा आंतरराज्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्सचा विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांच्या संपर्कात होता, अशी माहिती त्याच्या कॉल रेकॉर्डिंग वरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हाय प्रोफाइल ड्रग्स बनवून तो इंटरनॅशनल ड्रग्स बनवण्याचा प्रयत्न करणार होता, अशी देखील माहिती पोलिसांना आतापर्यंत त्याच्या चौकशी मिळाली आहे.


ललित पाटीलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन?


नाशिकमध्ये ड्रग्स बनवणारा ललित पाटील हा महाराष्ट्रातून इतर सप्लाय करत होता. हे ड्रग्ज महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तर काही भागांमध्ये जात होते. ललित पाटील याचे कनेक्शन फक्त इथवर न थांबता दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यात देखील पसरले होते. ललित पाटील याला नाशिकमधील फॅक्टरी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मात्र ललित पाटीलचं हे ड्रग्जच साम्राज्य फक्त आंतरराज्या पुरतंच मर्यादित नव्हतं तर तो देशाबाहेर देखील पसरवण्याच्या तयारीत होता, ही माहिती देखील त्याच्यात तपासात समोर आली आहे. 


Lalit Patil Drug Case : एकीकडे रासलिला, दुसरीकडे विदेशातील ड्रग्ज रॅकेटचा अभ्यास; ललित पाटीलच्या कॉल रेकॉर्डमधून ड्रग्ज रॅकेचा Future Plan समोर