नाशिक : नाशिकमधील ड्रग्जचा गुंता सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. नाशिकसह, पुणे (Pune), मुंबई पोलीस (Mumbai Police) या प्रकरणामागे हात धुवून लागले असून अशातच अटकेत असलेल्या ललित पाटील यास नाशिकमध्ये आणण्यात आलं होत. ड्रग्ज फॅक्टरीसह पाटीलच्या घरी देखील झाडाझडती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर तपासात असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ललित पाटीलला घेऊन जाण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकमधील ललितने पाटीलशी संबंधित असलेल्या ठिकाणांहून पोलिसांना काय धागेदोरे सापडतात हे पाहावे लागणार आहे. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिक ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोजच या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या भूषण पाटील यास तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. त्यानंतर ललित पाटीलला देखील अटक करण्यात आली. आता त्याला देखील मुंबई पोलिसांनी काल रात्री उशिरा नाशिकमध्ये आणून ललित पाटीलच्या संबंधित ठिकाणांची झाडाझडती घेतल्याचे समोर आले आहे. ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आता वेग आला आहे. मुंबई पोलिसांचे पथक तपासकमी ड्रग्जमाफिया ललित पाटीलला घेऊन आज पहाटे नाशिकमध्ये दाखल झाले होते. 4.30 ते 5 वाजेच्या सुमारास त्याच्या उपनगर परिसरातील घरी जाऊन पाहणी करण्यात आली. तसेच काही साहित्यही ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी काल रात्री उशिरा ललित पाटील याला त्याच्या नाशिक येथील घरी घर झडतीसाठी नेले होते. या ठिकाणी घराची झाडाझडती घेईन पोलिसांनी काही साहित्य ताब्यात घेतल्याचे समजते आहे. त्यानंतर पोलिसांनी लागलीच ज्या शिंदे गावात हे सगळं घडत होत, त्या ड्रग्ज कारखान्यावर ललित पाटीलला नेण्यात आलं. पोलिसांचा यांचा दावा आहे की, तो दाखल असलेल्या रुग्णालयातुन एमडी ड्रुग्सची तस्करी व व्यवसाय करत होता. ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटीलच्या संपर्कात होता आणि ड्रग्जचा व्यवसाय करत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात, कोणकोणते नवे पत्ते समोर येतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 


सांगा ललित पाटील नेमका कुणाचा?


नाशिक ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या ललित पाटीलला घेऊन मुंबई पोलिसांच्या त्यांच्या नाशिकमधील घराची मुंबई पोलिसांनी झाडासाठी घेतली आहे. काल रात्री उशिरा मुंबई पोलीस त्याला घेऊन नाशिककडे निघाले होते. आज पहाटे मुंबई पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली आहे. तसेच नाशिकमधील उध्वस्त केलेल्या ट्रस्ट फॅक्टरीतही ललित पाटीलला मुंबई पोलीस घेऊन गेले, आता मुंबई पोलीस ललित पाटीलला घेऊन मुंबईकडे रवाना झाले. तर दुसरीकडे सांगा ललित पाटील नेमका कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऐरणीवर आला आहे. ड्रगमाफिया ललित पाटीलवरून एकमेकांचे राजकीय स्कोअर सेटल करण्याची स्पर्धाच भाजप शिंदे गट आणि ठाकरे गटात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. ललित पाटील नेमका कुणाचा यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आणि भाजपा असा सामना सुरु आहे. 


इतर महत्वाची बातमी :  


Lalit Patil Supporter Special Report : ललित पाटीलचा पाठीराखा नेमका कोण?