नाशिक : 2014 ते 2019 शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का? तर पवार साहेबांनी सांगितलं होतं. तुम्ही काळजी करू नका, आम्ही पाठीशी आहे. शिवसेना जेव्हा थोडी नाटक करायला लागली होती. तेव्हा 2019 ची निवडणूक झाल्यावर त्यांनी चार चार वेळा दिल्लीत मिटींग केल्या होत्या. त्याचवेळी अजित दादा पहाटेच्या सुमारास गेले, भाजपची खेळी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले, मात्र खरी गुगली शरद पवार यांनीच टाकल्याचा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. 


अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवर अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वीही गौप्यस्फोट केले आहेत. अशातच नाशिकमध्ये (Nashik) असलेले गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवर प्रकाश टाकला आहे. 2014 पासून अनेक किस्से महाराष्ट्राच्या राजकरणात घडले आहेत, यात राष्ट्रवादी पक्षाचा महत्वपूर्ण  वाटा आहे. 2019 च्या निवडणुकीनंतरची अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी देखील ठरलेला होता, या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. ही गोष्ट शरद पवार नाकारू शकत नाही, शिवाय त्यावेळी आम्हाला पाठिंबा देण्याबाबतही शरद पवार आग्रही होते, हे देखील तितकेच सत्य असल्याचे महाजन म्हणाले. 


गिरीश महाजन म्हणाले की, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, ज्यावेळी 2014 ते 2019 शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का? तर पवार साहेबांनी सांगितलं होतं. तुम्ही काळजी करू नका, आम्ही पाठीशी आहे. शिवसेना जेव्हा थोडी नाटक करायला लागली होती. म्हणजेच 2019 ची निवडणूक झाली तेव्हा त्यांनी चार चार वेळा दिल्लीत (Delhi) मिटींग केल्या होत्या. पहाटेच्या शपथविधीसाठी अजित दादा गेले, त्यावेळी शरद पवार यांनी भाजपची खेळी असल्याचे सांगितले. मात्र ही शरद पवार यांचीच गुगली होती. ते आमच्या सोबत होते, त्यांचा मानस होता. परंतु त्यांनी आम्हाला गाफील ठेऊन खरी गुगली टाकली, घात करायचा ही त्यांची परंपरा असल्याचे महाजन म्हणाले. 


आता केळीच्या पानावर जेवायला द्यायचं का.... 


दरम्यान अजित पवार म्हणाले त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाने भाजपाला (BJP) 2014 साली उघड पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं म्हणून तर आम्ही दावा केला होता. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. दिल्लीत जाऊन किती वेळा बैठका झाल्या. आमच्या नेत्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाच्या पालकमंत्री पदाच्या वाटाघाटी केल्या. आणि आता ते या सर्व गोष्टीबाबत नाही म्हणून पडले. मात्र अजित दादा म्हणत आहेत, ते खरं आहे. अजितदादा देखील त्या बैठकीला उपस्थित होते, हे शरद पवार नाकारू शकत नाही, असंही महाजन म्हणाले. तसेच शरद पवार नुकतंच झालेल्या जी २० परिषदेवर टीका केली. शरद पवार म्हणाले, 'माझ्या कधी असं वाचनात आलं नाही की, त्या आधीच्या दोन परिषदांना चांदीची ताटं, सोन्याची ताटं' आणि आणखी काय काय होतं. यावर महाजन म्हणाले की, मग काय आता त्यांना केळीच्या पानावर जेवायला द्यायचं. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आपला देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे. सोन्याच ताट कोणी जेवायला ठेवतं का? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. 


इतर महत्वाची बातमी : 


Maharashtra News : पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार