नांदेड :  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना घेराव घालत आहेत. मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेची राजकीय नेत्यांनी देखील धास्ती घेतली आहे. शनिवारी काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना घेराव घातल्याची घटना घडल्या नंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच नांदेड आणि लातूरच्या भाजप खासदाररांनी देखील रात्रीतून उदघाट्न कार्यक्रम रद्द केले आहे. 


भाजप नेत्यांचा दौरा रद्द


 प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना घेराव घालत आहेत. मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेची राजकीय नेत्यांनी देखील धास्ती घेतली आहे. शनिवारी काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना घेराव घातल्याची घटना घडल्या नंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच नांदेड आणि लातूरच्या भाजप खासदाररांनी देखील रात्रीतून उदघाट्न कार्यक्रम रद्द केले आहे



धर्माबाद इथल्या वादावादीचा सकल समाजाकडून निषेध; चव्हाण यांच्या घरापुढे सुरक्षा वाढवली


नांदेडच्या धर्माबाद शहरात शनिवारी (9 सप्टेंबर) सकल मराठा समाज आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात वादावादी झाली, यावेळी चव्हाण यांना प्रश्न विचारल्याने ते चिडल्याचा आरोप होतोय. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी फुले पुतळ्यासमोर एकत्र येत चव्हाण यांचा निषेध नोंदवलाय. दरम्यान या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घरा समोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. घरासमोर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


 


अशोक चव्हाण यांना सकल मराठा समाजाकडून घेराव


राठा आरक्षणासाठीच्या रोषाचा आज काँगेस नेते अशोक चव्हाण यांना देखील सामना लरावा लागला. जिल्हयातील धर्माबाद येथे आज माजी मंत्री तथा मराठा आरक्षण समितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण हे धर्माबाद तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी आले होते. या ठिकाणी अशोक चव्हाण पोहचताच सकल मराठा समाजाकडून त्यांना घेराव घालण्यात आला. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं असा सवाल एका तरुणाने अशोक चव्हाण यांना विचारला. त्यानंतर या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी झाली. जमावाचा रोष पाहून अशोक चव्हाण पोलीस बंदोबस्तात बाहेर पडले.