नाशिक : 'आम्ही कुठेही गेलो तरी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचे (Sambhaji Bhide) खरे नाव मनोहर कुलकर्णी असून ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही असं भुजबळांनी म्हंटल. यासोबतच ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या, त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं? आपण आपले देव ओळखायला शिका, अस म्हणत पुन्हा सरस्वती देवीवरून छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal)  अप्रत्यक्षपणे टिका केली आहे. 


नाशिक (Nashik) शहरातील मखमलाबाद परिसरातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या (MPV Collage) शैक्षणिक संकुलात आयोजित समाजदिन सोहळ्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या. त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं असा प्रश्न उपस्थित करत आपण आपले देव ओळखायला शिका, असा सल्ला भुजबळांनी दिला. तसेच शाळा, महाविद्यालयांत मेरिटमध्ये अनेक मुली असतात, त्यात मुस्लिम मुली देखील असतात, ते पाहिल्यावर समाधान वाटतं, असेही भुजबळ म्हणाले. 


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, अजित दादांनी (Ajit Pawar) कबूल केलेले पैसे मिळणार असून वेगवगेळे अभ्यासक्रम महाविद्यालयांत शिकवले गेले पाहिजते. त्यासाठी मुलांना वेगवेगळ्या फॅकल्टीमधून शिकू दिले पाहिजे. जे शिक्षण घेता येईल ते घेऊ दिले पाहिजे. अलीकडे सोशल मीडियाचा वापर वाढत चालला असून सोशल मीडियाचा अतिरेक बरा नाही. कारण आजकाल सोशल मीडियातील सर्व गोष्टी खऱ्या नाहीत. अनेकदा त्यातून फसवणूक देखील होते. शाळेत देखील याबाबत जनजागृती होणे आवश्यक असून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच उदाहरण म्हणजे सिंगापूरमध्ये प्राईम मिनिस्टर नंतर 2 नंबरचा मंत्री शिक्षण मंत्री असतो, असेही भुजबळांनी सांगितले. शाळेच्या आठवणी ताज्या करताना भुजबळ म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची परेड पाहून आनंद वाटला. मी पहिल्यांदा म्युनिसिपल शाळेत शिकलो. त्यावेळी मला एका महिला शिक्षिकेने शिकवलं, तसेच मी नेवल NCC मध्ये प्रमुख कॅडेट होतो. आजचा कार्यक्रम, विद्यार्थ्यांची तयारी पाहून पुन्हा लहान व्हावं वाटलं. आज एकीकडे हा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे राज्यातीलच नव्हे देशातील उद्योग क्षेत्रातील महत्वाचे नाव असलेल्या रतन टाटा यांचा उद्योग रत्न म्हणून सन्मान करण्यात आला. आजही ते त्यांच्या कामाप्रती प्रामाणिक असून टाटा गृप कमावतो, त्यापेक्षा 80 टक्के दान करतात, असे म्हणत टाटा ग्रुपचे कौतुक केले. 


निवडणुकीवेळी काहीही करा, मात्र.... 


संभाजी भिडेंचे खरे नाव मनोहर कुलकर्णी असून ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही. त्यामुळे इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभ राहावं लागेल. ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या. त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं, असा प्रश्न उपस्थित करत आपण आपले देव ओळखायला शिका, असा सल्ला भुजबळांनी दिला. बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि सत्तेत सामिल व्हा. बाबासाहेब सत्तेत सामिल झाले आणि आपल्याला संविधान मिळालं. आज सरकारच्या माध्यमातून अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. यात 50 हजार रुपये जमीन खरेदी योजनेतून देणार आहेत. या योजनेचा लाभ घ्या, अनेक योजना अजित दादा तिथल्या तिथे पार पाडत आहेत. निवडणुकीवेळी काहीही करा, मात्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : 'आपण कुठेही गेलो तरी फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही', मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही