नाशिक : गेल्या 48 दिवसांपासून उपोषण सुरु असून अद्यापही एकही नाशिकच्या (Nashik) लोकप्रतिनिधींनी आरक्षणाचा मुद्दा सरकारपर्यंत मांडला नाही. गेली दोन पंचवार्षिक आपला पाठीशी मराठा बांधव राहिल्याने निवडून आलात. मग आता मराठा बांधवांच्या पाठीशी राहणे आवश्यक असताना तुम्ही आजपर्यंत कुठं होतात? राजीनामा द्या, अथवा संसदेत जाऊन आरक्षणाचा मुद्दा मांडा, अन्यथा उपोषणस्थळावरून काढता पाय घ्या, असा इशारा नाशिकमधील उपोषण कर्त्यांनी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना दिला.
मागील दोन दिवसांपासून मराठा आंदोलनाला (Maratha Andolan) हिसंक वळण लागले असून संपूर्ण राज्यातील अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. दुसरीकडे गाड्यांची तोडफोड, राजकीय नेत्यांच्या पोस्टरला काळे फासून शासनाचा निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी विविध मार्गातून आंदोलन सुरु आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नाशिकमध्ये मराठा बांधवांकडून उपोषण सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे साखळी उपोषण आमरण उपोषणात रूपांतरित झाले आहे. मात्र एकही मराठा लोकप्रतिधीने विचारपूस केली नसल्याचे मराठा आंदोलकांकडून (Maratha Reservation) सांगण्यात आलं. आणि याच पार्श्वभूमीवर आज हेमंत गोडसे उपोषणस्थळी पोहचल्यांनंतर आंदोलकांकडून धारेवर धरण्यात आले. राजीनामा द्या, अन्यथा इकडे फिरकू नका, असा सज्जड दमच आंदोलकांनी गोडसेंना दिला.
आज नाशिक (Nashik) सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा कार्यक्रमी हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार होता. शिवाय खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे देखील उपस्थित राहणार होते. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दौरा रद्द झाला, तर गोडसे यांनी देखील कार्यक्रमाला जाण टाळलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर दुपारी हेमंत गोडसे यांनी उपोषणस्थळी गाठलं. यावेळी उपोषणकर्त्यांसह उपस्थित मराठा बांधवाना गोडसेंची चांगलीच कानउघाडणी केली. संतप्त उपोषणकर्ते व सकल मराठा समाज आंदोलकांनी त्यांना संसदेत जा, येथे येऊ नका, तुम्ही आजपर्यंत कुठं होता? निवडणुकीत मराठा हवा, मग अडचणीत त्याला एकट टाकता का? अशा शब्दात मराठा बांधवानी खडसावले.
राजीनामा द्या अथवा माघारी जा....
नाशिकचे शिवतीर्थ येथे गेल्या 48 दिवस अखंडित मराठा बांधवांकडून साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणात सक्रिय नाना बच्छाव दोन दिवसापासून आमरण उपोषणात बसले आहे. दरम्यान आंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अन्न पाणी सोडण्याच्या सहाव्या दिवशी त्यांची शारीरिक स्थिती चिंताजनक आहे. यामुळं मराठा समाजाला शब्द देऊन फसविणाऱ्या शिंदे सरकारविरोधात राज्यभर आता तीव्र संताप असून महाराष्ट्रात आता तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. यामुळं गाव खेड्यात शहरात गाव नेत्यांना बंदी असतांना आज नाशिकच्या उपोषण स्थळी खासदार हेमंत गोडसे दाखल झाले. त्यावेळी मराठा आंदोलक व मराठा कार्यकर्त्यांनी थेट अनेक प्रश्न करत राजीनाम्याची मागणी केली.
इतर महत्वाची बातमी :