नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना धमकी देणं हे चूक आहे. भुजबळ आमचे दैवत असून असं काही होत असल्यास बाकीचा समाज गप्प बसणार नाही. माझं आवाहन आहे की, अशा धमकी देऊ नका, हे योग्य नाही. आणि जर छगन भुजबळांच्या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा रासपचे महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी दिला आहे. 


राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाने सध्या राज्यभर जनस्वराज्य यात्रा सुरू केली असून, ही यात्रा काही कुणाला विरोध करण्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी काढली असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. आज सकाळी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) दर्शन घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना आलेल्या धमकीचा जाहीर निषेध करत संबंधितांना सज्जड दमच दिला आहे. छगन भुजबळ यांच्या मागे लागू नका, आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा जानकर यांनी दिला आहे. 


महादेव जानकर यावेळी म्हणाले की, मराठ्यांना, धनगरांना, आदिवासींना आरक्षण (Reservation) मिळाले पाहिजे, ही माझ्यासह अनेकांची भूमिका आहे. मात्र याआधी काँग्रेसने खेळवत ठेवलं, आता भाजप तेच करतं आहे. भाजप काँग्रेससारखे वागत असून आरक्षणासाठी लोकसभेत बील पास केले पाहिजे. यातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी जानकर यांनी केली. तर नाशिकमध्ये आदिवासी समाजाकडून आदिवासी आरक्षणाच्या रक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal)  यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता टीका केली. यावर जानकर म्हणाले की, झिरवाळ हे संविधानिक पदावर असून त्यांना ते शोभत नाही. काही गोष्टी संयमाने घेतल्या पाहिजे, आपण लोकप्रतिनिधी आहोत हे ध्यानात ठेवून काम केले पाहिजे. तसेच कुठल्याही जातीत भेदभाव न करता सगळ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका जानकर यांनी मांडली. 



छगन भुजबळ आमचे दैवत 


दरम्यान छगन भुजबळ यांना धमकी आल्यानंतर जानकर यांनी देखील कडक शब्दांत ताशेरे ओढले आहे. छगन भुजबळ आमचे दैवत असून अशा प्रकारे धमकी देणं चूक आहे. बाकीचा समाज गप्प बसणार नाही. अशा धमकी देऊ नका, हे योग्य नाही, तसेच या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा जानकर यांनी दिला. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाकडून मागील अडीच महिन्यापासून जनस्वराज्य दौरा सुरू आहे. अनेक राज्यात आम्ही गेलो, जाणार आहे. जनतेचे राज्य आले पाहिजे, सगळे पक्ष साथ देत आहे, जनस्वराज्य यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे जानकर म्हणाले. 



इतर महत्वाची बातमी : 


Chhagan Bhujbal : मराठ्यांनी मोठं केल्याचं सांगून शिव्या देतात, पण मला शिवसेना अन् बाळासाहेबांनी मोठं केलं : छगन भुजबळ