Lalit Patil Drug Case : काही दिवसांपूर्वी नाशिक ड्रग्ज प्रकरणी नाशिकचा सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आला होता. अखेर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली असून त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील ससूनमधून पळून गेल्यानंतर नाशिकला सराफ व्यावसायिकाला भेटला होता, येथूनच त्याने सोने, सत्तर लाख रुपयांची रक्कम घेऊन गुजरातला पसार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिकचं ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन ट्वीस्ट येत असून राज्यातील तीन पोलिसांच्या टीम्स या प्रकरणात लक्ष घालत असल्याने वेगवगेळ्या ठिकाणाहून नवी माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून नाशिकच्या सराफा व्यावसायिकाची चौकशी केली होती. यात ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशातून सोने खरेदी केल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे संबंधित सराफ व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामुळे आता नाशिकचे आणखी काही सराफ व्यावसायिक पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. एकूणच नाशिकचे ड्रग्स कनेक्शन आता सराफ व्यवसायिकांपर्यंत पोहचल्याचे देखील यानिमित्ताने समोर आले आहे.
ललित पाटील प्रकरणात आता नाशिकमधील एका सराफा व्यावसायिकाची पुणे पोलिसांकडून आज चौकशी करण्यात येणार आहे. ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेल्यानंतर नाशिकमधील दुसाने नावाच्या या सराफा व्यावसायिकाकडे गेला आणि दुसानेकडून त्याने तीन किलो सोने आणि सत्तर लाख रुपये घेतले आणि त्यानंतर तो गुजरातला पसार झाल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सराफ व्यवसायिक दुसानेला आज चौकशीसाठी पुण्यात पाचारण करण्यात आल आहे. नाशिकच्या ज्या सराफाकडून सोने खरेदी केले, याची चौकशी सुरू असून ललित पाटीलचे इतर सराफ व्यावसायिकासोबतचे कनेक्शन उघड होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून नाशिक ड्रग्ज प्रकरण किती खोलवर रुजलंय याची प्रचिती पुन्हा पुन्हा येत आहे.
नाशिकच्या सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले...
दरम्यान नाशिकचा सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर असून त्याच्याकडून ड्रग्सच्या पैशातून ललित पाटीलसह भूषण पाटीलने सोने खरेदी केल्याचं उघड झाले आहे. सोने खरेदीसह सत्तर लाख रुपये घेऊन तो गुजरातला पसार झाला होता. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी 3 किलो सोने हस्तगत केले. या प्रकरणात नाशिकमधील सराफ व्यावसायिकाचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित सराफ व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून आज चौकशी केली जाणार आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या सराफ व्यवसायिकांकडून आणखी कुणाकुणाची नावे समोर येतात हे पाहणे महत्वाचे आहे.
इतर महत्वाची बातमी :