नाशिक : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दोन दिवसांपासुन पावसाची संततधार (Rain) सुरूच आहे, आज पहाटेपासून पावसाने उघडीप दिली असली तरी गंगापूर पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून (Gangapur Dam) 2272 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होता, तो 10 वाजता 1136 क्युसेकने वाढवून एकूण 3408 क्युसेकने करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. तर शनिवारी मात्र यलो अलर्ट असूनही फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात पावसाची संततधार सुरूच असल्याने गंगापूर धरणसाठ्यात वाढ झाल्याने शनिवारी सायंकाळपासूनच गोदावरी नदीत विसर्ग करण्यात येत होता. हा विसर्ग रात्री दहापर्यंत वाढविण्यात आला. मात्र पावसाची रिपरिप सुरूच असल्याने आजही विसर्ग (Water Discharged) वाढविण्यात आला असून यामुळे गोदावरी नदी खळाळून वाहू लागली आहे. आज सकाळी 10 वाजता 1136 क्युसेकने वाढवून एकूण 3408 क्युसेकने करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


मागील दोन दिवसांपासून नाशिकसह जिल्हाभरात (Nashik Rain) सुरू असलेल्या पावसाने शनिवारी सकाळपासून थोडीशी उघडीप दिली आहे. मात्र गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढला आहे. यामुळे काल सायंकाळ पासूनच गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे यात वाढ करण्यात येऊन आज आठ वाजता 2772 क्युसेकने विसर्ग करण्यात आला, त्यानंतर आता सकाळी दहा वाजेपासून 3408 दिवसांनी विसर्ग करण्यात येणार आहे, त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात मात्र आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असून अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत जिल्हावासीय आहेत. 


गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला.... 


नाशिक शहर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या 97.10 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, तर गंगापूर धरण समूहात 94 टक्के पाणी आहे, परंतु जिल्ह्यातील धरणांची स्थिती पाहिल्यास गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही 17 टक्के पाणी कमीच आहे, गतवर्षी 99 टक्के साठा होता, यंदा तो 82 टक्के आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वाढ झाली आहे, तर काही भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. तर नांदूरमधमेश्वर धरणातून आज सकाळी 8 वाजता 8731 क्यूसेक्स होता. तो 9 वाजता 1614 क्यूसेकने कमी करून एकूण 7117 क्यूसेक करण्यात येत आहे. तर दारणा धरणातून आज सकाळी 9 वाजता 3512 क्यूसेक्स होता. सकाळी 10 वाजता 804 कुसेक्सने कमी करून एकूण 2708 क्यूसेक्स करण्यात येत आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Gangapur Dam Level : नाशिकमधील गंगापूर धरण 97 टक्के भरलं, गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ