नाशिक : हल्ली अन्नपदार्थातून विषबाधा (Poisoning) होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील करंजाळी येथून जवळच असलेल्या उभीधोंड येथे धार्मिक उत्सवानिमित्त दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात येताच करंजाळी (Karanjali) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तातडीने उपचार केल्याने 31 बाधितांवर घरी सोडण्यात आले आहे, तर आठ बाधितांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली.


नाशिक जिल्ह्यातील पेठ (Peth Taluka) तालुक्यातील करंजाळीजवळ उभीधोंड गावात धार्मिक उत्सवाचे आयोजन केले होते. या धार्मिक उत्सवात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थांनी प्रसाद सेवन केल्यानंतर पहाटेला जुलाब, उलट्या, मळमळ असा त्रास सुरु झाल्याचे समोर आले. धार्मिक उत्सवाच्या प्रसादातून 39 भाविकांना विषबाधा (Poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. पेठ तालुक्यातील उभीधोंड येथील धार्मिक उत्सवात ग्रामस्थांनी दूध, पुरणपोळी, बटाटा भाजी, पेढा व दह्याच्या प्रसादाचे सेवन रात्रीच्या सुमारास केले. त्यातूनच 39 भाविकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. विषबाधा झाल्याचे लक्षात येताच आयोजकांनी तात्काळ सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला. 


दरम्यान गावात धार्मिक उत्सव असल्याने ग्रामस्थांनी प्रसादाचे सेवन रात्रीच्या सुमारास केले. यानंतर पहाटेपासून गावातील बहुसंख्य ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना तात्काळ करंजाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच वैद्यकीय पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होत बाधितांवर उपचार सुरू केले. 39 बाधितांपैकी 31 बाधितांवर औषधोपचार करून घरी सोडण्यात आले तर आठ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील घटनास्थळी भेट देत संबंधित भाविकांचे विचारपूस केली तसेच आरोग्य व्यवस्थेला योग्य उपचार करण्यासाठी सूचना देखील दिल्या. 


लातूरमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा


लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडार येथील जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास पंधरा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळात विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्या विद्यार्थ्यांना उदगीर येथील रुग्णालय दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान उपचारासाठी दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी खिचडीमध्ये अळ्या असल्याच्या आणि तांदळाला जाळ्या आणि हरभरे हे किडके वापरल्याचा आरोप केला आहे. सद्यस्थितीत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Shirdi News : सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा, 82 विद्यार्थी शिर्डी संस्थानच्या रूग्णालयात दाखल