नाशिक :  नाशिकचे खासदार (Nashik MP) हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून आज पदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्याकडे पाठवला, लवकरच लोकसभा अध्यक्षाकडे (Loksabha Speaker) राजीनामा पाठविणार असल्याची प्रतिक्रिया हेंमत गोडसे यांनी 'एबीपी माझा'ला दिली. खासदार गोडसे यांनी राजीनाम्याबाबत निर्णय का घेतला, राजीनाम्याआधी काय घडलं, याची माहिती समोर आली आहे. 


खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक (Nashik) शहरातील शिवस्मारकावर सुरु असलेल्या उपोषण स्थळावर भेट दिली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) त्यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळातच खासदार हेमंत गोडसे यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल झाले असून त्यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपला राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमधून पहिल्यांदा हेमंत गोडसे यांनी आपला राजीनामा दिला असून लवकरात लवकर मराठा बांधवाना आरक्षण द्यावे, अशी मागणी राजीनाम्याद्वारे करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही खासदाराचा राजीनामा हा लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सचिवालयकडे द्यायचा असतो, मात्र हेमंत गोडसे यांनी पक्षाचे प्रमुख म्ह्णून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. 


नेमकं काय घडलं?


समाजाच्या दबावामुळे गोडसे याना कमीतकमी मुख्यमंत्रीकडे राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. गोडसे यांनी आज आमरण उपोषण करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली. तिथेच आंदोलकांनी खासदार गोडसे याना खडेबोल सुनावले तुम्हाला इथे बोलावले नव्हते 40 दिवस आला नाही आता का येत आहेत, तुम्ही समाजासाठी राजीनामा द्या अशी मागणी आंदोलकांनी केल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 


गोडसे यांनी राजीनामा पत्रात काय म्हटले?


आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या भावनांचा होणारा उद्रेक पाहून मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन मराठा समाज आरक्षणासाठी झटत आहे. आरक्षण नसल्याने शिक्षण आणि नोकन्या मिळणेकामी मराठा समाजातील मुलांची मोठी कुचंबना होत आहे. मागील आठवड्यापासून पुन्हा आरपारच्या लढाईसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यामुळे राज्यभरातील तमाम मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने मराठा समाजाच्या भावनांचा आता राज्यभर उद्रेक होऊ लागला आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी आपल्या पक्षाचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या खासदारकीचा राजीनामा आपणांकडे सादर करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे.